Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सुवर्णपदक विजेता प्रणव राऊतची गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love

सुवर्णपदक विजेता २२ वर्षीय बॉक्सर प्रणव राऊत याने अकोल्यातील शास्त्री स्टेडियमजवळच्या क्रीडा प्रबोधनीत गळफास घेतला. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. जानेवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणवने सुवर्णपदक जिंकले होते. आज सकाळी साडे नऊच्या सुमारस प्रणव रुम मधूनबाहेर आला नाही म्हणून त्याच्या मित्रांनी दरवाजा ठोठावला. पण तो आतून बंद होता. अनेक वेळा आवाज देऊन देखील तो दरवाजा उघडत नसल्याने मित्रांनी दरवाजा तोडला. तेव्हा प्रणवने गळफास घेतल्याचे आढळले.

त्याच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रणव कालपर्यंत ठिक होता. त्याच्या वागण्यातून किंवा बोलण्यातून तो कोणत्याही तणावात किंवा दबावात नव्हता. वयाच्या २२ व्या वर्षी प्रणवने अचानक टोकाचे पाऊल का उचलले याचा सर्वांना धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत. प्रणवच्या आत्महत्येमुळे अकोला आणि महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

प्रणवच्या आत्महत्येविषयी माहिती मिळताच क्रीडा प्रमुख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अकोल्यातील रामदास पेठ पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. प्रणव आज (शुक्रवार २१ फेब्रुवारी) सकाळी क्रीडा प्रबोधनीत आला होता. प्रणवच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!