Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

एमआयएमचे नेते वारीस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ

Spread the love

कर्नाटकाच्या गुलबर्ग्यात जाऊन एका सभेत ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे  नेते माजी आमदार वारीस पठाण यांनी केलेल्या खळबळजनक विधान करून नवा वादनिर्मण होत असल्याचे दिसत आहे. “आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट ” असे त्यांचे विधान असून त्याची चर्चा सुरु झाली आहे. कर्नाटकमधील गुलबर्गा येथे सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी त्यांनी १५ फेब्रुवारी रोजी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. विशेष म्हणजे याप्रसंगी एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची देखील उपस्थिती होती.

आपल्या भाषणात वारीस पठाण म्हणाले कि , “केवळ शब्दांनी उत्तर देता येणार नाही, विटेला दगडाने उत्तर देणं आपण शिकलो आहोत. मात्र, एकत्र होऊन चालावं लागेल. स्वातंत्र्य घ्यावं लागेल व जी गोष्ट मागितल्याने मिळत नाही, ती हिसकावून घ्यावी लागेल. हे लक्षात असू द्या. आता वेळ आली आहे. आम्हाला म्हणाले महिलांना पुढं केलं, आता तर फक्त वाघिणी बाहेर निघाल्या आहेत, तर तुम्हाला घाम फुटला. मग विचार करा आम्ही सोबत आलो तर काय होईल. १५ कोटी आहोत पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा. असं पठाण यावेळी म्हणाले आहेत. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

दरम्यान एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी  सातत्याने सीएए,एनआरसी व एनपीआरचा विरोध केलेला आहे. सुधारित नागरिकत्व कायद्या (सीएए) विरोधात ओवेसी यांनी काही दिवसांपुर्वी मोठं विधान केलं होतं. मी देशातच राहील, कागदपत्र दाखवणार नाही. कागदपत्र मागाल तर छाती दाखवू मारा गोळी, असं ओवेसी म्हणाले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!