Chandrapur Accident : देवदर्शनावरून परतणाऱ्या स्कॉर्पिओला भीषण अपघात , ६ जागीच ठार तर ६ जखमी

Advertisements
Advertisements
Spread the love

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील केसलाघाट येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव स्कॉर्पिओ गाडीने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व मृत व्यक्ती चंद्रपुरातील असून गोंदिया येथून देवदर्शनाहून परतत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. मृतांची आणि जखमींची नवे तत्काळ समजू शकली नाही , याबाबत पोलीस अधिक तपस करीत आहेत. मृतांमध्ये दोन पुरुष तीन महिला व व दोन वर्षाच्या मुलाचा समावेश आहे  तर जखमींमध्ये चालकासह पाच महिलांचा समावेश आहे. जखमींना उपचारार्थ चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisements

या विषयीची अधिक माहिती अशी कि , चंद्रपूर-मुल मार्गावरील केसला घाट ते नागाळा दरम्यान हा अपघात झाला.  भरधाव वेगातील स्कॉर्पिओ रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रक वर धडकल्याने हा भीषण अपघात झाला. या  अपघातात स्कॉर्पिओ मधील सहा जण जागीच ठार झाले तर सहा जण गंभीररीत्या जखमी झाले. बुधवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे वृत्त आहे. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना वाचविण्यासाठी एकच गर्दी केली होती. चंद्रपूरच्या बाबुपेठ परिसरातील भोयर व पाटील कुटुंबातील सदस्यांचा मृतांमध्ये आणि जखमींमध्ये समावेश आहे. सहापैकी चार मृतदेहांसह  सहा गंभीर जखमींना प्रारंभी मुलच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. हा अपघात इतका भीषण होता की अपघातात जागीच ठार झालेल्या दोघांचे मृतदेह अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढता आले नाही. अपघातातील जखमी व मृतांची नावे  रात्री उशिरापर्यंत कळू शकली नाही.

Advertisements
Advertisements

उपलब्ध माहितीनुसार बाबुपेठ येथील भोयर व पाटील कुटुंबीय देवदर्शनासाठी भंडारा जिल्ह्यातील प्रतापगड येथे स्कॉर्पिओ क्रमांक एम एच ३४ एबी ९७८६ या वाहनाने गेले होते रात्री उशिरा या दोन्ही कुटुंबियातील व्यक्ती मुरुड मार्गे बाबुपेठ येथे परतत असताना चंद्रपूर मार्गावरील केसला घाट ते नागाळा दरम्यान रस्त्यात उभ्या असलेल्या एम एच ३४ ए पी २५३३ या नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगातील स्कॉर्पियो ने ट्रकला जोरदार धडक दिली आणि क्षणार्धात हा भीषण अपघात झाला. अपघातातील जखमी जखमींना चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आपलं सरकार