Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : शिवजयंती मिरवणुकीतील “त्या ” खूनप्रकरणात एकास अटक , एक फरार

Spread the love

कल शिवजयंती मिरवणुकीच्या दरम्यान श्रीकांत नावाच्या तरुणाला चाकुने भोसकल्याचा प्रकार घडला होता. हा प्रकार काही तरुणांनी पाहिला होता. त्यामुळे या तरुणांनी मारेक-यांची माहिती तात्काळ पुंडलिकनगर पोलीसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, जमादार रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, विलास डोईफोडे, जालिंदर मांटे, प्रविण मुळे, दीपक जाधव, निखील खराडकर, राजेश यदमळ, रवि जाधव व शिवा गायकवाड यांनी विजय  वैद्य याला दुपारी  अडीच ताब्यात घेतले असून अजय हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी राहुल भोसलेचा पोलीस शोध घेत आहेत. विजय हा नुकताच वोखार्ड कंपनीत कामाला लागला होता.

हत्या झालेल्या तरुणाचं नावं श्रीकांत गोपीचंद शिंदे असं आहे. श्रीकांत हा मिरवणुकीत सहभागी झाला होता. मिरवणूक शांतपणे पुढे जात असतानाच त्याचं आणि इतर काही तरुणांचं भांडण झालं. त्यानंतर सर्व जण पुन्हा मिरवणुकीत सहभागी झाले. श्रीकांत हा नाचत असतानाच भांडण झालेले तरुण पुन्हा त्याच्या जवळ आले. त्यातल्या एकाने आपल्या जवळच्या चाकूने त्याच्या छातीमध्ये वार केले.

…….
तीन दिवसांपुवीर्ही केले वार
गारखेडा परिसरातील प्रशांत प्रकाश खजाणे (२५, रा. भारतनगर) यालाही  काही एक कारण नसताना १६ फेब्रुवारीला सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास विजय वैद्य, नवनाथ शेळके आणि त्यांच्या एका साथीदाराने मारहाण केली होती. याचवेळी खजाणेच्या गालावर चाकुने वार करण्यात आला होता. खजाणेच्या तक्रारीवरुन तीन दिवसांपुर्वीच विजय वैद्यवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पुंडलिकनगर पोलीसांनी त्याला अटक केली नव्हती.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!