शिवजयंती साजरी करण्यासाठी किल्ल्यावर गेलेल्या तरुणीचा मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबईहून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी आलेल्या २० वर्षीय तरुणीचा जुन्नरजवळ असलेल्या हडसर किल्ल्यावरुन पडून  मृत्यु झाल्याची दुःखद घटना घडली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. ही तरुणी मुंबईची रहिवासी असून ती मित्रांसोबत शिवजयंती साजरी करण्यासाठी हडसर किल्ल्यावर केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे शिवजंयतीच्या उत्सवावर विरजण पडले आहे.

Advertisements

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबई येथील एक गट शिवजयंती साजरी करण्यासाठी जुन्नर जवळील हडसर किल्ल्यावर आली होती. या गटातील एका तरुणीचा किल्ल्यावरून पडून मृत्यू झाला. ही घटना सकाळी ११.३० ते १२ वाजेच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत तरुणीच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार