Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : दारु पिऊन पोलिस ठाण्यात धिंगाणा, पोलिस कर्मचार्‍याला ९ टाके, आरोपीला बेड्या

Spread the love

औरंगाबाद – दारुच्या नशेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देत पोलिस ठाण्याच्या काचेवर डोके फोडून पोलिस कर्मचार्‍याला जखमी करणार्‍या मजुराला सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करंत जवाहरनगर पोलिसांनी जेरबंद केले.
शेख शकील शेख लाल (४५) धंदा मजुरी रा.इंदीरानगर गारखेडा असे अटक आरोपीचे नाव आहे.मंगळवारी सकाळी ११.३०वा.शेख शकील हा दारु पिऊन जवाहरनगर पोलिस ठाण्यात आला व त्याने पोलिस ठाण्यात उपस्थित असलेल्या पोलिसांना सांगितले की, त्याला संग्रामनगर उड्डाण पुलाच्या बाजूला तीन जणांनी मारहाण केली. त्यावेळी त्याच्या चेहर्‍यावर मारहाणीच्या खुना दिसंत होत्या. म्हणून जवाहरनगर पोलिसांनी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी मेडिकल मेमो दिला व सांगितले की, तुमच्याबाबतीत घडलेला गुन्हा सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.तुम्ही तक्रार तिकडे द्या.पण शेख शकील याने पोलिसांना शिवीगाळ करंत पोलिस ठाण्यात असलेल्या काचेवर डोके आपटले. व गुन्हा जवाहरनगर पोलिस ठाण्यातच दाखल व्हायला हवा असे म्हणू लागला या वेळेस काच फुटुन त्याचे तुकडे पोलिस हवालदार दत्ता घोडके यांच्या हातावर उडाले. यामधे घोडके यांच्या हाताला ९ टाके पडले.
वरील प्रकरणाचि तपास पोलिस निरीक्षक नरेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्रध्दा वायदंडे करंत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!