ट्रक आणि व्हॅनमध्ये भीषण अपघात व्हॅनमधील ७ जणांचा होरपळून मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

उन्नाव टोलजवळ ट्रक आणि व्हॅनमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेसवेवर झालेल्या  भीषण अपघातात व्हॅनमधील सातही जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघाताबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केलाय. अपघातग्रस्त व्हॅनमधून सात मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पण व्हॅनधील प्रवासी कोण होते हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. उन्नावमधील अंकित वाजपेयी या नावाने या व्हॅनची नोंद आहे. मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं उन्नावचे जिल्हाधिकारी देवेंद्र कुमार पांडे यांनी सांगितलं. अपघातानंतरचा व्हिडिओही समोर आला आहे.

Advertisements

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेसवेवर चुकीच्या दिशेने व्हॅन चालवण्यात आल्याने हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर एकच धावपळ उडाली. व्हॅनने पेट घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केले. अग्निशमन दलाची गाडीही दाखल झाली. पण तोपर्यंत उशीर झाला होता, अशी प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार