दुःखदायक : स्वतःच्या लग्नात नवरीसोबत धमाल डान्स करता करता , नवरदेव वरातीतच कोसळला…. लगीनघरावर शोककळा !!

Advertisements
Advertisements
Spread the love

स्वतःच्या लग्नात आनंदाने बेहोष होऊन पत्नीसोबत सगळ्यांना खूश करत  बिधास्त डान्स करणाऱ्या नवदेवाला ह्रदयविकाराचा झटका बसल्याने त्याचे निधन झाले असल्याचे वृत्त आहे . तेलंगणामध्ये हा  धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आला आहे. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण लग्नघरावर  शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त  केली जात आहे.  गुरुवारी रात्री निजामाबाद जिल्ह्यातील बोधन शहरात ही घटना घडली आहे. गणेश असं मृत्यू झालेल्या २५ वर्षीय नवरदेवाचं नाव आहे.

Advertisements

या प्रकरणात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार गणेश आखाती देशातील एका कंपनीत कार्यरत असून गेल्या सात दिवसांपूर्वी तो आपल्या लग्नासाठी गावी  आला होता.  गणेशने गुरुवारी बोधन शहरात लग्न केलं. त्यानंतर रात्री गावात वरात काढण्यात आली. वरातीमध्ये गणेश आणि त्याच्या पत्नीने धमाल डान्स केला. गणेश लग्नाच्या वरातीमध्ये इतक्या उत्साहाने नाचत होता की त्याला हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबातील सदस्यांनी त्याला तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल केलं पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान डीजेच्या मोठ्या आवाजामुळे तो अस्वस्थ झाला आणि त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप गणेशच्या कुटुंबीयांनी केला.  या प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. खरंतर गणेशच्या लग्नामुळे संपूर्ण घरात आनंदाचं वातावरण होतं. तो आणि त्याची पत्नी वरातीमध्ये धमाल डान्स करत होते. या नव्या जोडप्याचा आनंद पाहून सगळेजण खूश होते. पण या खुशीमध्ये अचानक दुखाचा डोंगर कोसळला आहे. पतीच्या अशा जाण्यामुळे पत्नीलाही मोठा धक्का बसला आहे.

आपलं सरकार