Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : बोगस चेक द्वारे वटवले १६लाख, दोघांना बेड्या, रत्नागिरी आणि पुण्यातही असेच प्रकार घडल्याचे पोलिस तपासात उघड

Spread the love

भगवान मुळे                                                 शिवाजी ठोंबरे 

औरंगाबाद – अलाहाबाद बॅकेच्या बिहार मधील भागलपूर शाखेत खाते असलेल्या व्यापार्‍याचा करमाडच्या दोन व्यापार्‍यांनी बोगस चेक द्वारे १६ लाख रु.चा अपहार केल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांंनी दोघांना बेड्या ठोकल्या. या प्रकरणी अलाहाबाद बॅंकेचे मुख्य समन्वयक दिपक श्रीवास यांच्या फिर्यादीवरुन  जिन्सी पोलिस ठाण्यात आज सकाळी १०.३० वा. गुन्हा दाखल झाला असला तरी तपास पोलिसआयुक्तांच्या आदेशाने पुढील तपास पुंडलिकनगर पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , भगवान मुळे आणि शिवाजी ठोंबरे दोघेही रा. करमाड अशी अटक आरोपींची नावे आहेत.या दोघांपैकी भगवान मुळे हा फॅब्रीकेटरचा व्यवसाय करतो तर शिवाजी ठोंबरे हा प्लाॅटिंगचा व्यवसाय करतो. यातील शिवाजी ठोंबरे याने भगवान मुळे कडून १० लाख रु.चे साहात्य घेतले. पण १६ लाखांचा चेक दिला.व १६ लाख काढून घेऊन १० लाख मुळे ला ठेवून घ्यायचे सांगून सहा लाख रु.परत  मागितले.त्या प्रमाणे भगवान मुळे ने चेक वटवून १० लाख स्वता:ठेवले व ६ लाख ठोंबरेला परत  केले. हा व्यवहार शेंद्रा परिसरातील अलाहाबाद बॅंकेतून वटवले होते.पण १६ लाख वटवण्यापूर्वी बॅंक मॅनेजरने बिहारच्या भागलपूर बॅंकेत १६ लाख रु.चा चेक कोणाचा आहे व तो वटवण्यास दिला आहे का ? अशी चौकशी केली. त्यावेळी हा चेक बबलू लक्ष्मण हरी यांचा आहे. पण बबलू हरी यांचा फोन नं अपडेट नसल्यामुळे बबलू हरी शी संपर्क झाला नाही. तसेच शेंद्रा येथील अलाहाबाद बॅकेच्या शाखेत सी.टी.एस.क्लिअरिंग मशीन खराब असल्यामुळे त्यांनी ५ फेब्रूवारी रोजी औरंगाबादेतील जालनारोडवरील अलाहाबाद बॅंकेतून सी.टी.एस. मशीनद्वारे चेक वटवून दिला.

दरम्यान भागलपूर बिहार च्या बबलू हरी यांनी अलाहाबाद बॅंकेकडे त्यांच्या खात्यातून १६ लाख कसे दुसर्‍या खात्यावर देण्यात आले ? याबाबत विचारणा केली. व ज्या चेक द्वारे ही रक्कम हरी यांच्या खात्यातून वजा झाली. त्यांच्या खात्याचा चेक हरी यांच्याकडेच होता. हा प्रकार बनावट चेक द्वारे घडल्यामुळे अलाहाबाद येथील अलाहाबाद बॅंकेचे मुख्य समन्वयक दिपक श्रीवास यांच्या फिर्यादीवरुन जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान ४ फेब्रूवारी रोजीही अलाहाबाद बॅंकेच्या रत्नागिरी शाखेतून ९७ हजार काढण्यात आले.तर पुण्यातील मांजरा परिसरातील बॅंकेतून ७८ लाख ५६ हजार ९०० रु. वटवून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. बनावट चेक तयार करुन अपहार करणारी मोठी टोळी कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात उघंड झाली आहे. पोलास आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय घन्नशाम सोनवणे या प्रकरणी अधिक  तपास करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!