Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : वडगाव कोल्हाटीतील कुंटणखान्यावर पोलिसांची कारवाई, आंटीसह तीन ग्राहक गजाआड

Spread the love

औरंंंगाबाद : वडगाव कोल्हाटी येथे गेल्या अनेक वर्षापासून बिनबोभाटपणे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर एमआयडीसी वाळुज पोलिसांनी शनिवारी सायंकाळी कारवाई करीत कुंटणखाना  उध्वस्त केला. पोलिसांनी या कारवाईत एका आंटीसह तीन ग्राहकांना अटक केली. तसेच देहविक्री करण्यासाठी आलेल्या सहा महिलांची कुंटणखान्यातून  सुटका केली.
वडगांव कोल्हाटी येथील अण्णाभाऊ साठे चौकात एका किरायाच्या घरात गिता उर्फ  आशा  (वय ४०, रा.मुकुंदवाडी ) ही आंटी कुंटणखाना  चालवित असल्याची माहिती एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत यांना मिळाली होती. पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहाय्यक आयुक्त गुणाजी सावंत, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे उपनिरीक्षक विठ्ठल चासकर, जमादार वसंत शेळके, खय्युम पठाण, वसंत जिवडे, रामदास गाडेकर, फकीरचंद फडे, प्रदीप कुटे, सतवन सोहळे, दिपक मतलबे, बंडू गोरे, प्रकाश गायकवाड, मनमोहन कौलमी, सुधीर सोनवणे, नवाब शेख आदींच्या पथकाने सापळा रचून कुंटणखान्यावर छापा मारला.
या कारवाईत पोलिसांनी आंटी गिता उर्फ  आशा कदम हिच्यासह गिरधर किसन सोनवणे (वय ३२), कौतीक गंगाधर वहाटुळे (वय ३५) दोघे राहणार डोंगरगाव, ता.फुलंब्री , शेख युनूस शेख इब्राहीम (वय ३५, रा.बिडकीन) या तिघांना अटक केली. तसेच देहविक्री करण्यासाठी आलेल्या सहा महिलांची कुंटणखान्यातून   सुटका केली. देहविक्री करण्यासाठी एक महिला हैदराबाद येथील नामपल्ली येथून या ठिकाणी आली असल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विजय घेरडे करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!