चर्चेतली बातमी : टोटल इंदोरीकर महाराज : जाणून घ्या वाद नेमका आहे तरी काय ? युट्युबर्सवर भडकले महाराज , व्हिडीओ शूटिंगला आता बंदी…

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख आपल्या खुमासदार  शैलीमुळे अबाल -वृद्धांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांच्या या शैलीमुळे इंदोरीकर महाराज देशातच नव्हे तर ” या या या …बस आमच्या बोकांडी ” या वाक्यामुळे विदेशातही प्रसिद्ध आहेत. त्यांचे युट्युब व्हिडीओ लाखो यूजर्स पाहतात आणि त्यांना फॉलो करतात . टिकटॉक वरही त्याच्या प्रवचनातील डायलॉग तोडून हजारो टिकटॉक स्टार सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. याच व्हिडीओने महाराजांना वादात आणले आहे. त्यामुळे इंदोरीकर महाराज  युट्युबर्सवर जाम चिडले आहेत. दोन -तीन दिवसांपासून महाराज कीर्तनातील आपल्या  प्रवचनतील काही वाक्यांमुळे चर्चेत आले आहेत. खरे तर ते नेहमीच आपल्या कीर्तनात असे काही तरी बोलतात पण त्यांच्या या वाक्यांकडे काल परवा पर्यंत कोणी गांभीर्याने बघितले नव्हते पण, त्यांच्याच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस पाठवून आक्षेपार्ह वाक्यांचा खुलासा मागितला आहे त्यामुळे महाराज व्यथित झाले आहेत.


बीएस्सी बीएड असणाऱ्या इंदुरीकर महाराजांच्या या पाच गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ? 

आपल्यावरील वादाला वैतागून उत्तर देताना महाराज म्हणाले कि ,‘२६ वर्षे झाली. मला बायको नाही. पोरगं नाही. रात्रं-दिवस प्रवास, कष्ट, कष्ट, कष्ट, कष्ट… लोकांसाठी करायचं. दोन-अडीच तासाच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतो. पण मी बोललेलो वाक्य चुकीचं नाही. समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी हे भागवत, ज्ञानेश्वरीतही सांगितलंय. मी म्हणतोय ते खरंय. तरी लोकं म्हणतायेत याला ठेवून द्या पहिलं. तीन दिवसांत अर्धा किलोनं वजन घटलं. यूट्यूबवाल्यांना इंदुरीकराच्या नावानं मोक्कार पैसा मिळाला. मी काय या यूट्यूबचा एक रुपयाही घेतला नाही. ही यूट्यूबवाली मंडळी झाली कोट्यधीश. प्रत्येक व्हिडिओला एक एक लाख लाइक आहेत. पैसाच मोजता येईना, इतका पैसा झालाय. पाहणाऱ्यांची संख्या खूप आहे .

Advertisements

” बोल भिडू “ या वेबसाईटवर त्यांची जी थोडक्यात माहिती दिली आहे. त्यात त्यांचे लग्न झालेले असून त्यांच्या पत्नी शालिनीताई देशमुख स्वतः प्रवचनकार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य सुद्धा चर्चेचा विषय होणार असे दिसत आहे. कीर्तनकार म्हणून शालिनीताई देशमुख या सुद्धा प्रसिद्ध कीर्तनकार असून त्या स्वतः सुद्धा कीर्तन करतात.

Advertisements
Advertisements

याविषयावर दोन दिवस कुठलीही प्रतिक्रिया न देणाऱ्या इंदोरीकर महाराजांनी आता मात्र आपले तोंड उघडले आहे. आपल्यावरील आरोपांना जाहीर उत्तर देताना त्यांनी म्हटले आहे कि , ‘दोन तासांच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मात्र मी जे बोललो, ते चुकीचं नाहीच. मी बोललेलं अनेक ग्रंथात नमूद आहे. वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस बघेन आणि कीर्तन सोडून शेती करेन,’ असं इंदुरीकर म्हणाले. समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी असं वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केली आहे. या सर्व वादावर इंदुरीकर महाराजांनी काल (१४ फेब्रवारी) शुक्रवारी रात्री बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात झालेल्या एका कीर्तनात भाष्य केले. या कीर्तनाचा व्हिडिओ त्यांचे समर्थक सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. इंदुरीकर महाराजांनी संपूर्ण वादाचा ठपका यू ट्यूब चॅनलवर ठेवला आहे. ते म्हणाले, यू-ट्यूबवाले काड्या करतात. यू ट्यूब चॅनलवाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु हे चॅनेल संपतील, मी नाही’, असं इंदुरीकरांनी ठणकावलं.

‘यूट्यूबवाले आणि कॅमेरावाले माझ्या मागे लागलेत. इंदुरीकर संपवायला निघालेत. मी कशात सापडेना म्हणून मला गुंतवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी आता एका वेगळ्या निर्णयाप्रत आलोय. एखाद-दुसरा दिवस जाऊ द्यायचा. आता लय झालं. फेटा ठेवून द्यायचा. आपली सहन करायची कॅपॅसिटी संपली,’ असं त्यांनी सांगताच उपस्थित चकित झाले.

दरम्यान शिक्षकांविरोधात केलेल्या टिप्पणीची त्यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली असल्याने आता शिक्षक संघटना त्यांच्यावर नाराज झाल्या आहेत. ३४ मिनिटांच्या तासिकेत शिक्षक हे पाच मिनिटं वर्गात जाण्यासाठीच घेतात. वर्गात गेल्यानंतर फळा पुसायला पाच मिनिटं आणि त्यानंतर आदल्या दिवशी काय झालं ते सांगायला पाच मिनिटं घेतात. हे सगळं झाल्यावर उद्याच्या तासाला काय शिकवणार हे सांगायलाही पाच मिनिटं घेतात. त्यानंतर मग तास संपला हे सांगायची वेळ येते, असा अनुभव त्यांनी सांगितला होता. त्यांच्या या ‘शिकवणी’मुळं शिक्षक संघटना प्रचंड नाराज झाल्या आहेत.

याबद्दल शिक्षक संघटनेने म्हटले आहे कि , ‘शिक्षकांना काहीच काम कसं नसतं हे इंदुरीकर महाराजांना सुचवायचं आहे. पण ते स्वत: एक शिक्षक आहेत हे त्यांनी विसरू नये. त्यांनी शिक्षकांची प्रतिमा मलिन करू नये,’  कठीण गोष्टी किर्तनातून सांगण्यासाठी किर्तनकारांकडून अनेकदा प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणं दिली जातात. मात्र, ते करताना किमान भान बाळगलं जावं. एखाद्याची अप्रतिष्ठा होणार नाही याची काळजी संबंधितांनी घ्यायला हवी, असं मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

महाराजांच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांचा मोर्चा 

महाराजांवरील वाद लक्षात घेऊन इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ओझर बुद्रुक (ता. संगमनेर) गावातून मोर्चा काढला. या शाळेचे विद्यार्थीही आता इंदुरीकर महाराजांच्या पाठीशी असल्याचे या मोर्चात दिसले. गर्भलिंग निदानाबाबत वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज अडचणीत सापडले आहेत. या वक्तव्याप्रकरणी आरोग्य विभागाने त्यांना नोटीस दिली आहे. तर दुसरीकडे महाराजांचे जोरदार समर्थन केले जात आहे. शुक्रवारी ओझर गावातून विद्यार्थ्यांनी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. या मोर्चात शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

महाराज आता बाउंसरच्या संरक्षणात 

दरम्यान या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) हे नगर येथील भिंगार येथे कीर्तनासाठी शनिवारी आले होते. यावेळी इंदुरीकर महाराज यांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. बाउन्सरच्या कड्यामध्येच ते कीर्तनस्थळी आले. वादाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. कीर्तन चालू असताना आता महाराजांकडून व्हिडीओ शूटिंगलाही बंदी करण्यात आली आहे. आज  शनिवारी भिंगार येथे श्री शुक्लेश्वर मंदिरांमध्ये महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. महाराजांचे कीर्तन होणार का नाही, याबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता होती. मात्र, इंदुरीकर आले. त्यांच्यासाठी खासगी सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. गाडीतून उतरल्यानंतर ‘बाउन्सर’नी त्यांच्याभोवती कडे केले. त्या सुरक्षेतच त्यांना कीर्तनस्थळी आणण्यात आले. त्यानंतर सर्वात आधी कीर्तनाची शूटिंग करण्यासाठी लावण्यात आलेले कॅमेरे काढण्यास सांगण्यात आले. जोपर्यंत हे कॅमेरे काढण्यात येणार नाही, तोपर्यंत कीर्तन सुरू होणार नाही, अशी सूचनाही आयोजकांनी दिली. अखेर कॅमेरे काढल्यानंतर कीर्तन सुरू करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

आपलं सरकार