खळबळजनक : तोंडात डांबरगोळ्याचा कूट कोंबून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न , पतीला ठोकल्या पोलिसांनी बेड्या

Advertisements
Advertisements
Spread the love

भिवंडीमध्ये एका पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा गळा आवळून बळजबरीने तिच्या तोंडात डांबर गोळ्यांचा कूट कोंबून तिला जीवे  मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना भिवंडीतील स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागील एका खोलीत घडली आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात पीडित पत्नीच्या फिर्यादीवरून आरोपी पती विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करीत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहे. फिरोज खान (३०) असं आरोपी पतीचं नाव आहे.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा  रुग्णालयाच्या पाठीमागे अबूबकर यांच्या खोलीत आरोपी  फिरोज हा ३० वर्षीय पत्नीसह राहतो.मात्र, गेल्या काही दिवसांपासून फिरोज हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्यानं या वादातून त्यांचे भांडण झाले होते. त्यातच काल रात्रीच्या सुमारास फिरोज दारू पिऊन घरी आला असता. पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, त्याने पत्नीला बेदम मारहाण करीत तिचा गळा आवळून तिच्या तोंडात डांबरगोळ्याचा कूट टाकून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण वेळीच शेजाऱ्यांनी धाव घेऊन तिची सुटका केली.

Advertisements
Advertisements

शेजाऱ्यांनी जखमी झालेल्या त्याच्या पत्नीला तातडीने स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेवून पंचनामा करीत आरोपी पती फिरोज विरोधात भादवी. कलम ३०७, ३२३, ५०४ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सह पोलीस निरीक्षण अमोल मोरे करीत आहेत.

Leave a Reply

आपलं सरकार