मुलीनेच आपल्या बापाचा काटा काढण्याचे वचन प्रियकराकडून घेतले आणि त्याने सुपारी देऊन केला खून , तब्बल पाच महिन्यांनी घटना झाली उघड !!

Advertisements
Advertisements
Spread the love

प्रेयसीच्या रूपातील मुलीने आपल्या प्रेमात अडसर ठरणाऱ्या पित्याचाच काटा काढण्याचे वचन प्रियकराकडून घेतले आणि प्रेयसीला दिलेल्या वचनाही पूर्तता करण्यासाठी प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या वडिलांनाही हत्या करून वचनपूर्ती केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेश पोलिसांनी उजेडात आणली आहे . पोलिसांनी सांगितले कि ,  दिवाळीच्या दिवशी त्याने तिला वचन दिलं होते  की, तो तिच्या वडिलांचा खून करेल. या वचनपूर्तीसाठी आणि प्रेयसीला खुश करण्यासाठी त्याने एका गुंडाला चक्क दोन लाख रुपयांची सुपारी दिली. विशेष म्हणजे खून होत असताना सुपारी देणारा तरुण तिथं उपस्थित होता. खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मदत केली.

Advertisements

मध्यप्रदेशातील खंडवा येथे झालेल्या या खूनप्रकारणाचा उलगडा तब्बल पाच महिन्यानंतर पोलिसांना गुरुवारी झाला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी प्रियकर श्रवण लक्ष्मीनारायण कुमारे , त्याची प्रेयसी मृत व्यक्तीची मुलगी आणि त्याचा साथीदार जगदीश अजराजसिंह राजपूत रा. बोरीबांदरी जग्गा यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चाकूसह एक मोपेड आणि रक्ताने माखलेले कपडे जप्त केले आहेत. गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबरला प्रल्हाद जगन्नातथ चंडेल यांचा मृतदेह घोडापछाड नदीत मिळाला होता. त्यांच्या डोक्यावर जखमेचे व्रण आढळले होते. त्यांच्या हत्येचा तपास सुरु करण्यात आला होता. त्यानतंर शवविच्छेदनात प्रल्हाद यांची हत्या झाल्याचे समोर आले होते.हत्येनंतर प्रल्हाद यांचा मृतदेह नदीत फेकण्यात आला होता.

Advertisements
Advertisements

मयत व्यक्तीच्या मुलगा आकाश चंदेल याने वडील बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली होती. तेंव्हा त्याचे वडील प्रल्हाद चंदेल यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले होते दरम्यान या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरु होत. शेवटी पोलिसांनी बारकाईने तपास केला असता त्यांच्या फोनवर आलेला शेवटचा कॉल आरोपी आरोपी जगदीश उर्फ जागा याचा होता . त्यावरून पोलिसांनी तब्बल तीन महिन्यांनी आरोपी जगदीश जगदीश अजराजसिंह राजपूत याचा शोध घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने आपणच खून केल्याची कबुली देऊन सर्व प्रकार पोलिसांच्या कानावर टाकला तेंव्हा पोलिसांनी त्याच्या पाठोपाठ त्याला खुनाची सुपारी देणारा  मयताच्या मुलीचा प्रियकर श्रवण लक्ष्मीनारायण यालाही अटक करून मुलीलाही ताब्यात घेतले. दरम्यान आरोपींनी आपल्या कृत्याचा कबुली जबाब पोलिसात दिला आहे. पोलिस तपासात आरोपी श्रवणने सांगितलं की, प्रल्हाद यांच्या मुलीवर प्रेम होते. याला प्रल्हाद यांचा विरोध होता. हा अडथळा दूर करायचा होता. म्हणूनच प्रेयसीला दिवाळीच्या रात्री वडिलांना संपवणार असल्याचं सांगितलं होतं. शिवाय दिवाळीला इतका आनंद देईन की तुला तो सहन होणार नाही असेही त्याने म्हटले होते आणि तसे केलेही.

आरोपींनी पोलिसात दिलेल्या कबुली जबाबात म्हटले आहे कि , दिवाळीला २७ ऑक्टोबरला सकाळी ८.३० वाजता जग्गा दारु पित होता. त्याने श्रवणलाही तिथं बोलवून घेतलं. त्यानंतर श्रवणने प्रल्हाद यांना फोन करून दारुच्या अड्ड्यावर बोलवून घेतलं. मला न्यायला या असं प्रल्हाद यांनी सांगितलं. श्रवण आणि जग्गा हे प्रल्हाद यांनी आणण्यासाठी पोहोचले. चौपाटीवरून दोघांनीही त्यांना बाइकवरून आणलं. त्यानंतर प्रल्हाद यांना भरपूर दारू पाजली. पुन्हा बोरी बांदरी इथं जग्गाच्या घरी आणून तिथं दारू प्यायले. याच ठिकाणी श्रवणने चाकुचे वार प्रल्हाद यांच्या डोक्यावर केले. यातच त्यांचा मृत्यू झाला. यातील आरोपी जागा हा सराईत गुन्हेगार असून त्यांना मदत करणाऱ्या रामसिंह आणि भीमसिंह यांनाही ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ . शिवदयालसिंह यांनी सांगितले.

 

Leave a Reply

आपलं सरकार