Aurangabad : “कोम्बिंग ऑपरेशन” दरम्यान दोन हद्दपार पोलीसांच्या ताब्यात

Advertisements
Advertisements
Spread the love

पोलीस रेकॉर्डवरील दोन अट्टल गुन्हेगारांना उस्मानपुरा पोलीसांनी कोम्बिंग आॅपरेशनदरम्यान पकडले. अनिल उर्फ सोनू ज्ञानेश्वर दाभाडे (रा. नागसेननगर, उस्मानपुरा) आणि प्रविण शिवाजी त्रिभुवन (रा. छोटा मुरलीधरनगर, उस्मानपुरा) अशी दोघांची नावे आहेत. त्यांना १० डिसेंबर २०१९ रोजी सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले होते. त्यांच्यावर महिलांची छेडछाड, मोबाईल चोरी, मारामा-या अशा स्वरुपाचे बरेच गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक दिलीप तारे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक फौजदार कल्याण शेळके, जमादार प्रल्हाद ठोंबरे, शिपाई सतीश जाधव, संतोष शिरसाठ व संजयसिंग डोभाळ यांनी केली.

Advertisements

Leave a Reply

आपलं सरकार