Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वाढत्या महागाईने लोकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ, औद्योगिक उत्पादनाचा वेगही घटला

Spread the love

वाढत्या महागाईने जनता त्रस्त झाली असून घाऊक बाजारात डिसेंबर २०१९ मध्ये महागाई दर ७.३५ टक्के होता. जानेवारीत महागाई दर ४ टक्क्यांच्यावर होती. जानेवारीत भाजीपाल्यातील महागाई ५०.१९ टक्क्यांवर तर डिसेंबरमध्ये २०१९मध्ये हा आकला ६०.५० टक्के होता. डाळी आणि डाळींशी संबंधित उत्पादनांमध्ये १६.७१ टक्के महागाई होती. त्यातच आधी विनानुदानित आणि आता अनुदानित गॅसच्या दारातही वाढ झल्यामुळे जनतेत असंतोषाचे वातावरण आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र टाईम्स नाऊ च्या कार्यक्रमात बोलताना देशाची अर्थव्यवस्था सुधारत असून लोकांवर कमीत कमी टॅक्स लावणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक अव्व्ल असल्याचे प्रतिपादन केले होते. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही देशाची अर्थव्यवस्था चांगली असल्याचे प्रतिपादन केले असले तरी नागरिक वाढत्या महागाईला तोड  आहेत . हि वस्तुस्थिती सरकार काहीही केल्या मानायला तयार नाही असे एकूण चित्र आहे . दरम्यान डिसेंबरमध्ये औद्योगिक उत्पादनाचा वेग कमी झाल्याचेही  समोर आले आहे. डिसेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन ०.३ टक्क्यांनी घसरले. गेल्या वर्षी याच काळात २.५ टक्के वाढ दिसून आली होती. वस्तूंचे उत्पादन घटल्याने ही घसरण झालीय.चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबरमध्ये औद्योगिक विकास ०.५ टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या वर्षी याच काळात या क्षेत्रात ५.७ टक्के इतकी वाढ नोंदवली गेली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!