Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

निर्भया अत्याचार प्रकरणात दोषींच्या याचिकेवर सुनावणी करणा-या न्या . बानुमती झाल्या बेशुद्ध , सुनावणी आठवडाभर लांबणीवर

Spread the love

देशभर चर्चेत असलेल्या निर्भयाच्या गुन्हेगारांना स्वतंत्रपणे फाशी देण्यासंदर्भात याचिकेवर सुनावणी सुरू असताना सुप्रीम कोर्टच्या न्यायमूर्ती आर. बानुमती  अचानक बेशुद्ध झाल्या. गुन्हेगारांना एकत्रिच फाशी देण्यासाठी थांबण्याऐवजी स्वतंत्रपणे फाशी देण्यात यावी यासाठी केंद्र सरकारतर्फे याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर न्या. भानुमती आपला निर्णय वाचून दाखवत होत्या. त्यावेळी त्या अचानक बेशुद्ध झालाय आणि पुन्हा शुद्धीवर आल्या. पण त्यानंतर सुनावणी पुढे चालू न ठेवता त्यांना व्हीलचेअरवरून वैद्यकीय उपचारांसाठी हलवण्यात आलं. आता या प्रकरणातली सुनावणी पुढच्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकारानंतर ज्या न्यायमूर्तींचं खंडपीठ या प्रकरणी निर्णय देत होतं, त्यांनी ही माहिती दिली. या प्रकरणातला निर्णय नंतर जाहीर करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, यासाठी जबाव वाढत आहे. त्याच वेळी कायद्याच्या काही पळवाटा शोधून आरोपींचे वकील वेगवेगळ्या याचिका दाखल करत आहेत. सर्व गुन्हेगारांची दया याचिका फेटाळल्यानंतरही फाशीची तारीख आतापर्यंत दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. निर्भया केसमधला एक दोषी विनय शर्मा याची याचिका याआधीच काही वेळ फेटाळण्यात आली होती. आता सोमवारपर्यंत या केसची सुनावणी थांबवण्यात आली आहे.

देशाला हादरवणाऱ्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणात दररोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. सध्या निर्भया प्रकरणात डेथ वॉरंट बजावण्यासाठी पतियाळा हाऊस कोर्टात सुनावणी सुरू आहे. गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना कोर्टाचे वातावरण काही काळ तापले होते. निर्भयाच्या कुटुंबाचे वकील जितेंद्र झा यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, दोषी तुरूंगात आरामात आहेत आणि एन्जॉय करीत आहेत. हे ऐकताच दोषींचे वकील एपी सिंग यांनी निषेध व्यक्त केला

आपलं सरकार

Click to listen highlighted text!