Aurangabad Crime : महिला तस्करी प्रकरण, फिर्यादीलाच का ठोकल्या जवाहरनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या ?

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद तस्करी झाल्याचा बनाव करंत जवाहरनगर पोलिसांकडे तक्रार देणार्‍या फिर्यादी महिलेलाच जवाहरनगर पोलिसांनी बुधवारी रात्री बेड्या ठोकल्या अशी माहिती पोलिसआयुक्तालयातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
-जूलै २०१९मधे दाखल झालेल्या महिला तस्करी प्रकरणात ज्या महिलेची तस्करी झाली तिच्या संमतीने गुन्हा घडला होता.परंतू फिर्यादीला तिचा आर्थिक मोबदला न मिळाल्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली. या प्रकरणातील मुख्य आरोपी दलाल शिवाजी धनेधर याला जवाहरनगर पोलिसांनी अटक केली होती. अद्यापही तो अटकेत आहे.नौकरी लावण्याचा बहाणा करंत शिवाजी धनेधरने जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील संगिता आणि आरती (दोन्ही नावे बदलली आहेत) १लाख ८० हजारांना राजस्थानात विकल्याचा गुन्हा दाखल झाला होता.पण त्यावेळैस वरील संगिता आणि आरती गारखेडा परिसरात राहात होत्या.व त्या बेपत्ता झाल्याची तक्रार जवाहरनगर पोलिसांना संगिताच्या आईने दिली होती.पण या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली.त्यांना विक्री केल्याचे जवाहरनगर पोलिसांना कळले.व त्वरीत दलाल शिवाजी धनेधरला अटक केली.त्यानंतर या दोन महिलांना विक्री करण्याच्या प्रकरणात संगिता ही फिर्यादी होती.शिवाजी धनेधर हा गेल्या दहाबारा वर्षांपासून महिला तस्करी करतो.मध्यप्रदेशाततही शिवाजी धनेधरने महिला तस्करी केल्यामुळे २०१८साली शिक्षा भोगल्याचे जवाहरनगर पोलिसांच्या तपासात उघंड झाले होते.

Advertisements

एपीआय श्रध्दा वायदंडे यांनी या प्रकरणाचा तपास करुन दोन्ही महिलांना राजस्थानातून आणून कुटुंबियांच्या हवाली केले होते. त्यानंतर या प्रकरणातील फिर्यादीला शिवाजी धनेधरने तिचा हिस्सा दिला नाही व देतही नव्हता.त्यामुळे फिर्यादीने खरा प्रकार जवाहरनगर पोलिसांसमोर उघंड केला. पुरवणी जबाब नोंदवतांना संगिताने सांगितले की, दलाल शिवाजी धनेधरने त्यांना विक्री करणार असल्याची कल्पना दिली होती.त्यामुळे संगिताला व आरतीला भरघोस कमिशनही मिळणार होते. संगिता व आरतीला मध्यप्रदेशात ग्राहकांना दाखवल्यावर ग्राहकांनी संगिताचे १लाख व आरतीचे ८० हजार शिवाजी धनेधरला फिर्यादी समोरच दिले होते. आरतीला हा प्रकार किळसवाणा वाटल्यामुळे तिने वरील व्यवहाराला नकार दाखवला होता. पण संगिताने दमदाट्या करंत आरती ला तयार केले होते.व आरतीला शिवाजी धनेधरने राजस्थानातील हरनावडा गावात एका सधन शेतकर्‍याला विकले होते. विक्री केल्यावर संगिता आरतीला राजस्थानात भेटूनही आली होती.हा प्रकार संगिताने जवाहरनगर पोलिसांपासून लपवून ठेवला होता.पण आरतीला डिसैंबर २०१९ मधे राजस्थानातून आणल्यानंतर दोघींचे कमिशन देण्याची टाळाटाळ शिवाजी धनेधर करंत असल्यामुळे खरा प्रकार पोलिसांना सांगितल्याचे संगिताने जबाबात म्हटले आहे. वरील प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक नरेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय वायदंडे करंत आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार