Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabd Crime :नवऱ्याला चुना लावून गुजरातला पळून गेलेल्या नकली बायकोला नवर्‍याने केले पोलिसांच्या हवाली

Spread the love

औरंगाबाद – लग्न होताच एका आठवड्यातच मध्यवर्ती बसस्थानकातून पळून गुजराथ ला गेलेल्या बायकोला नवरोबाने तब्बल एक वर्षाने धरुन आणले. आपल्या बायकोला एक नवरा व दोन मुले असल्याचे समजताच औरंगाबाद पोलिसांच्या हवाली केले. या भामट्या बायकोने नवरोबाला तब्बल १लाख १५ हजारांना चुना लावला आहे. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा मंगळवारी मध्यरात्री दाखल झाला आहे. या बनावट बायको झालेल्या भामट्या महिलेला क्रांतीचौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या.या गुन्ह्यात अमोल रमेश देठेसह एक महिला आणि आणखी एक असे तीन फरार आरोपी आहेत. यापूर्वी या टोळीने अनेक लोकांना फसवले असल्याचे पोलिसांच्या तपासात उघंड झाले.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की,श्रीराम वीरभान पाटील(२७) रा.जवखेडेसीम ता.एरंडोल जि.जळगाव धंदा मजूरी यांचे वडिल वीरभान पाटील यांना कविता माळी रा.कन्नड यांनी ३०जानेवारी २०१९ मधे फोन केला तुमचा मुलगा लग्नाचा आहे का ? अशी विचारणा केली.वीरभान पाटील यांनी होकार देत मुलगा श्रीराम शी चर्चा केली. मुलीचा फोटो व माहिती मागवून मुलगी पाहाण्याची तयारी दाखवली म्हणून मुलगी पाहायचा कार्यक्रम ५ फेब्रूवारी २०१९ रोजी सिध्दार्थ गार्डन येथे एका महिलेने मुलगी पाहायचा कार्यक्रम उरकून घेतला. ही मुलगी पाहण्यासाठी वीरभान ने त्याचे वडिल आजोबा यांना खाजगी गाडी करुन औरंगाबादेत आणलेहोते त्यानंतर लग्नाच्या बोलाचालीत पाटील कुटुंबा कडून आरोपी महिलेने १ लाख रु.रोख घेतले. व नव्वदीचे नाव कविता रा. विसरुळूरमंगरुळ ता. चि. बुलढाणा असे असल्याचे सांगितले व त्याच दिवशी संध्याकाळी ७ वा. सातारा परिसरातील महादेव मंदीरात हे लग्न लावले.लग्नामधे नववधू च्या गळ्यात ९ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र घातले.व शंभर रु.च्या बॉन्डवर लग्न झाल्याचा व कविता माळी ला १लाख रु.रोख  दिल्याचा बाॅंड केला.लग्नानंतर सहा दिवसांनी ११फेब्रूवारीला श्रीरामच्या नववधूने आई आजारी असल्याचे सांगत माहेरी सोडून या असे म्हणून श्रीराम पाटील सोबंत औरंगाबादेत बसने आली. व चिखली गाडीची वाट पहात असतांना कविता उर्फ सीमा  गायब झाली.म्हणून घाबरलेल्या श्रीराम पाटील ने क्रांतीचौक पोलिस ठाण्यात बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. व जवखेडेसीम येथे परतला.या प्रकरणाने मानसिक दृष्ट्या खचलेल्या श्रीराम ने सुरत ला मजूरी करण्याकरता सुरत (गुजराथ)ला धाव घेतली.त्या ठिकाणी त्याची हरवलेली पत्नी कविता ऊर्फ सीमा सापडली.अचानक समोर आली.तिला गोड बोलून श्रीराम पाटलाने घरी सोबंत येण्याचा  आग्रह केला. ११फेब्रूवारी रोजी औरंगाबादेत आणून भामट्या बायकोला लाॅजवर ठेवले व क्रांतीचौक पोलिसांना भेटून त्यांच्याकडे सूपूर्द केले. वरील प्रकरणी पोलिस निरीक्षक उत्तम मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस नाईक जयश्री खोगरे, आणि जैस्वाल करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!