Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सोलापुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार , पाच जण अटकेत

Spread the love

सोलापुरातील विजापूर नाका परिसरात एका अल्पवयीन कॉलेज तरुणीवर सामूहिक बलात्काची घटना उघडकीस आली आहे . या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. इतरांचा शोध सुरू आहे. पीडित मुलीनं दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी लगेचच कारवाई करून पाच आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून अन्य आरोपीची माहिती घेतली जात असून पोलीस पथकं शोधासाठी रवाना झाली आहेत. या प्रकरणातील बहुतेक आरोपी रिक्षाचालक असल्याचं समजतं. आरोपींविरोधात भादंविच्या कलम ३७६ (ड), पॉस्को आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले कि , सदर पीडित तरुणी सोलापुरातील एका कॉलेजात शिकते. तिचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. या तरुणाचे इतर मित्र मागील जुलै महिन्यापासून तिच्यावर अत्याचार करत होते. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असहाय्य अवस्थेत रडत असलेल्या या पीडितेची माहिती एका नागरिकाने  पोलिसांना दिली होती . त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासातून ही घटना उघडकीस आली.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!