महागाईचा तडका , घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत आजपासून झाली वाढ , जाणून घ्या नवी किंमत…

Advertisements
Advertisements
Spread the love

गेल्या आठवड्यात व्यावसायिक गॅस च्या किमतीत वाढ झाल्यानंतर आता घरगुती गॅसच्या दरांतही  पुन्हा एकदा वाढ घोषित करण्यात आली आहे. इण्डेन , इंडियन ऑईलने  विना अनुदानित १४ किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत १४४.५० रुपयांपासून १४९ रुपयांपर्यंत वाढ जाहीर केलीअसल्याचे वृत्त आहे आजपासून  ही वाढ आजपासून लागू झाली आहे. यापूर्वी, १ जानेवारी २०२० रोजी घरगुती गॅसच्या किंमतींत वाढ घोषित करण्यात आली होती.

Advertisements

नव्या निर्णयानुसार  मुंबईत आता विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरसाठी ८२९.५० रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईत गॅसच्या किंमतीत १४५ रुपयांची वाढ करण्यात आलीय. तर राजधानी दिल्लीत सिलिंडरच्या किंमतीत १४४.५० रुपयांची वाढ करण्यात आलीय. दिल्लीत आता १४ किलोच्या गॅस सिलिंडरसाठी ८५८.५० रुपये मोजावे लागणार आहेत. भाववाढीनंतर कोलकातामध्ये नागरिकांना १४९ रुपये जास्त मोजून ८९६ रुपयांना गॅस सिलिंडर विकत घेता येईल तर चेन्नईमध्ये १४७ रुपयांच्या वाढीसहीत गॅस सिलिंडरचे दर ८८१ रुपयांवर पोहचले आहेत.

Advertisements
Advertisements

विशेष म्हणजे  म्हणजे, सबसिडी आणि बदलत जाणाऱ्या बाजार भावानुसार घरगुती गॅसच्या किंमतीतही बदल होतो. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला या दरांत कोणताही बदल झालेला नव्हता. १ फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पापूर्वी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांत २२४.९८ रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे सध्या व्यावसायिक वापरासाठी सिलिंडर १५५०.०२ रुपयांना मिळतोय. यावेळी घरगुती गॅसच्या किंमतीत मात्र वाढ झाली नव्हती. घरगुती गॅसचे एकूण २७.६ कोटी उपभोक्ते आहेत. यातील जवळपास दोन कोटी नागरिकांना सबसिडीचा लाभ घेता येत नाही. अनुदानित गॅसच्या किंमतींतही गेल्या सहा महिन्यांत १३ टक्क्यांनी अर्थात ६२ रुपयांनी वाढले आहेत. सरकारने  फ्युएल सबसिडीमध्ये कपात केल्यानंतर तेल कंपन्यांनी किंमती प्रकाशित करणे  बंद केले आहे.

आपलं सरकार