प्लॉटींग व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी कुख्यात बबलासह तिघे दोषी, न्यायालयाने केली दोघांची निर्दाेष मुक्तता

Spread the love

औरंंंगाबाद : प्लॉटींग च्या व्यवसायातून एका तरूणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मारेक-याने मृतदेहाचे तुकडे खाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने बबला गँगचा म्होरक्या बबलासह त्याच्या तीन साथीदारांना सुनावणीअंती दोषी ठरवले आहे. तर दोन जणांची निर्दाेष मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत.

प्लॉटींग व्यवसायीक शेख जब्बार शेख गफ्फार (वय ३०, रा.आसेफिया कॉलनी) या तरूणाचे १६ मे २०१८ रोजी शेख वाजेद उर्फ  बबला, बाबा लोली, अलीम, शेख अमजद, सिवंâदर व इतर दोघांनी बिस्मीला कॉलनी येथील खामनदीजवळ बेदम मारहाण करून अपहरण केले होते. त्यानंतर शेख जब्बार यांची दौलताबाद परिसरात हत्या करून बबलाने शेख जब्बार यांचे पोट फाडून मृताचे अवयव काढुन खाल्ले होते. त्यांतर शेख जब्बार यांच्या पोटात दगड टाकून  तो मृतदेह पाण्यात फेकला  होता. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी शेख वाजेद उर्फ बबलासह त्याच्या टोळीला अटक केली होती. खटल्याच्या सुनावणीत अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी २१ साक्षीदारांचे जवाब नोंदविले. फिर्यादी तर्फे अड. वर्षा घाणेकर-वाघचौरे यांनी बाजू मांडली.
दरम्यान, बुधवारी या प्रकरणाचा निकाल लागणार असल्याने न्यायालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कुख्यात शेख वाजेद उर्फ बबलाने यापुर्वी दोन वेळेस न्यायालयाच्या आवारात साक्षीदारांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. त्यामुळे बबलाला न्यायालयात विशेष बंदोबस्तात आणण्यात आले होते.

आपलं सरकार