Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतली बातमी : पोल्ट्री चिकन आणि कोरोनाचा काही संबंध आहे का ? त्यावर सरकारने दिले हे अधिकृत स्पष्टीकरण

Spread the love

केंद्र सरकारने करोना व्हायरस आणि चिकन खाणे यांचा काहीही संबंध नाही, असे  स्पष्टीकरण दिले आहे. चीनमधील शहर वुहानमधून पसरलेल्या करोना व्हायरसने जगभर दहशत निर्मण केली आहे. चीनमध्ये यामुळे हजारो जणांनी जीव गमावला आहे, तर भारतातही करोनाची लागण झालेले काही रुग्ण केरळमध्ये आढळून आले. त्यामुळे करोनामुळे चिकन खाणे  धोकादायक असल्याची चर्चा सुरू झाली. याबाबत सरकारने स्पष्टीकरण देत या सर्व अफवा असून त्यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केले आहे.

याबाबत केंद्रीय पशुपालनमंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे कि , ‘नागरिक बिनधास्तपणे पोल्ट्री चिकन खाऊ शकतात. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. जगभरातही करोना आणि पोल्ट्रीचा काही संबंध नाही. कोंबडीपासून हा रोग पसरल्याचं अजून कुठेही सिद्ध झालेलं नाही,’ असे  सांगत  याबाबतचं पत्र जारी करण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना दिले आहेत.

देशभरात  पोल्ट्री उत्पादन आणि करोना यांचा संबंध जोडल्याची अफवा  वाऱ्यासारखी पसरल्यामुळे कृषी आधारित समूह आयबी ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी गिरीराज सिंह यांची भेट घेतली. या भेटीनंतर मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. आयबी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक बहादूर अली, संचालक गुलरेज आलम, रिक्की थापर आणि विजय सरदाना यांनी केंद्र सरकारशी चर्चा केली.

दरम्यान करोनामुळे चीनमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असून आतापर्यंत १००० हून अधिक जणांचा बळी गेला आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाच्यावतीने याबाबत माहिती देण्यात आली. सोमवारी आणखी १०८ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर, २४७८ नवे रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, करोनामुळे १०१६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ४२ हजार ६३८ जणांना संसर्गाची लागण झाली आहे. हुबेई प्रांतात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सर्वाधिक मृत्यूची नोंद याच प्रातांतून झाली आहे. ३९९६ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!