Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हवा दिल्लीची : विधासभा २०२० : भाजपच्या पराभवावर काय बोलले शरद पवार ?

Spread the love

दिल्लीत भाजपचा झालेला दारुण पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या चांगलाच जिव्हारी लागणार असून यावर तोफ डागताना शरद पवार यांनी म्हटले आहे कि , ‘दिल्ली हे देशातील एक वेगळं शहर आहे. तिथं अनेक राज्यांतील लोक आहेत. त्यामुळं दिल्लीच्या निवडणुकीचा निकाल हा दिल्लीपुरता मर्यादित नाही. बदलाचं वातावरण देशभरात आहे. भाजपच्या पराभवाची मालिका सुरू झाली आहे आणि ती आता थांबणार नाही,’ असा ठाम दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला.

आपल्या ट्विटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमधील निकालावर प्रतिक्रिया दिली असून प्रारंभीच त्यांनी अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलं आहे. त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे कि , दिल्लीत सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत देत दिल्लीकरांनी सत्तेवर बसण्याचा कौल दिल्याचे प्राथमिक कलांमधून दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या भाजपानं ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रावाद विरूद्ध विकास अशी ही निवडणूक लढवली गेली. त्यात दिल्लीकरांनी विकासाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील हे जवळपास निश्चित आहे. या सर्वांमध्ये काँग्रेसची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!