Crime News Update : धक्कादायक : आजोबा आणि नातीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना ….

Advertisements
Advertisements
Spread the love

स्त्रिया आणि लहान मुलींवरीवरील लैंगिक अत्याचाराचे इतके गुन्हे उजेडात येत असतानाही असे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांच्या मानसिकतेत कुठलाही बदल होत नसल्याचे धक्कादायक चित्र सातत्याने बघावयास मिळत आहे . आजोबा आणि नातीच्या नात्याला काळीमा फासणारी अशीच एक धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यात उघड झाली आहे. या प्रकरणात  एका ४० वर्षीय नराधमाने दोन अल्पवयीन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, या नराधमाने आपल्याच नातीवर दुष्यकृत्य केलंय.

Advertisements

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , गोंदिया जिल्ह्यातील फुलचुर गावात ५ फेब्रुवारी रोजी ही लज्जास्पद घटना घडली. या ४० वर्षीय नराधमाने घरी कुणीही नसल्याने  शेतावर लागून असलेल्या लाखोरीच्या शेंगा खावून येवू असं सांगत आपल्या नातीला आणि घरा शेजारी राहणाऱ्या  मुलीला सोबत घेऊन गेला. या दोन्ही मुलींचं वय अनुक्रमे ७ आणि ८ वर्ष आहे. शेतावर नेऊन या नराधमाने दोन्ही अल्पवयीन मुलींवर अत्याचार केले. अत्याचार केल्यानंतर या प्रकरणाची कुठेही वाच्यात होऊ नये म्हणून त्याने पीडित मुलींच्या हातात १० रुपये दिले आणि त्यांना घरी सोडून दिले दरम्यान घरी गेल्यानंतर या पीडित मुलींना वेदना झाल्याने याची माहिती मुलींनी आईला सांगितली त्यानंतर  या मुलींनी आपल्यासोबत घडलेला प्रसंग कुटुंबीयांना सांगितला. मुलींनी सांगितलेल्या माहितीनंतर कुटुंबाला एकच हादरा बसला. त्यानंतर नातेवाईकांनी थेट पोलीस स्टेशन गाठून नराधम आजोबा विरोधात गुन्हा दाखल केली. आरोपी विरोधात गोंदिया ग्रामीण पोलीसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्याच्या विरोधात बाललैगिक अत्याचार आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार