Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

साखरपुड्याच्या कार्यक्रमावरून परतणाऱ्या कुटुंबियांच्या कारला भीषण अपघात , तरुणाच्या पित्यासह ३ ठार

Spread the love

मुलाचा साखरपुडा करून आनंदाने सर्व  परिवार घरी जात असताना रस्त्यावरच चौधरी कुटूंबावर काळाने घाला घातला. विचखेडे गावाजवळ भरधाव कार एसटी बसवर समोरून धडकून झालेल्या अपघातात कारमधील तीन जण ठार तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. तर बसमधील प्रवाशी सौरभ प्रविण पाटील (रा.उंदीरखेडे ता,पारोळा) हा देखील अपघातात जखमी झाल्याची घटना आज रात्री साडेसातच्या सुमारास घडली. अपघातात ठार झालेले चौधरी कुटुंबीय हे धुळे येथील रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार ते पाचोरा येथे संजय चौधरी यांचा चिरंजीव विनय चौधरी याचा साखरपुड्याच्या  कार्यक्रम आटोपून घरी परत येत असताना या कुटुंबीयांवर काळाने झडप घातली. अपघातानंतर महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. हा अपघात इतका भीषण होता, की कारच्या समोरील बाजूचा अक्षरशः चुराडा झाला. बसचेही समोरील बाजूचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर कारचा चालक जागीच ठार झाला. तो कारच्या पत्र्यात अडकला होता. पारोळा येथून क्रेन मागवून कारमध्ये अडकलेल्या चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

तिघांचा जागीच मृत्यू 

दरम्यान बसला कारने समोरून दिलेल्या धडकेत संजय नारायण चौधरी (वय ५६), सरला रवींद्र चौधरी (वय ४५) आणि मिनल संजय चौधरी (वय २३, तिघे रा. धुळे) अशी या अपघातात ठार झाले आहेत. तर नीता संजय चौधरी (वय ४७), रविंद्र नारायण चौधरी ( ६९) आणि विवान चौधरी (वय ५ तिघे रा. धुळे) आणि र सौरभ पाटील अशी जखमींची नावे आहेत. चौधरी कुटुंबीय (एम. एच. 18 बी. सी. 0575) क्रमांकाच्या कारने घरी परत येत होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर विचखेडे गावाजवळ त्यांची कार धुळ्याकडून जळगावच्या दिशेने येणाऱ्या शिर्डी- भुसावळ या एसटी बसवर (एम. एच. 20, 3943) आदळली. अपघातानंतर विचखेडे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी जखमींना तातडीने उपचारासाठी पारोळा कुटीर रुग्णालयात हलवले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!