Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हिंगणघाट येथील पीडितेच्या भावाला गावापर्यंत नेण्यासाठी प्रशासनाने केली गाडीची व्यवस्था

Spread the love

हिंगणघाट येथे भर रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर आता तिच्या अंत्यसंस्कारासाठी भावाची प्रतिक्षा आहे. पीडित तरुणीचा भाऊ जळगावला इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. परीक्षा असल्या कारणाने भाऊ तिथेच थांबला होता.

आज सकाळी बहिणीच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर तो वर्ध्याला येण्यासाठी जळगावहून निघाला आहे. वर्ध्याला ट्रेन पोहोचायला संध्याकाळचे चार वाजतील. तो आता अमरावतीपर्यंत पोहोचला आहे. वर्ध्याला उतरल्यानंतर पीडितेच्या भावाला तिथून गावापर्यंत नेण्यासाठी प्रशासनाने गाडीची व्यवस्था केली आहे.

हिंगणघाट येथे एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या तरूणीला आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. तरुणी सोमवारी सकाळी घरून हिंगणघाटला आली होती. तिच्या मार्गावर दबा धरून बसलेल्या आरोपी विकेश नगराळे यानं तिला गाडीतील पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. तरूणीनं आरडाओरड केल्यानंतर आग विझवून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेनं अखेरचा श्वास घेतला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!