Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सततच्या रॅगिंगला कंटाळून भावी डॉक्टर विद्यार्थ्यांची आत्महत्या

Spread the love

सतत होणाऱ्या रँगिंगच्या त्रासाला कंटाळून बीड जिल्ह्यातील नाळवंडी येथील गणेश कैलास म्हेत्रे या विद्यार्थ्यांने  विष घेवून जीवन संपवले. गणेश हा उदगीर येथील धनवंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयात बी.ए.एम.एस.च्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. या ठिकाणी होणाऱ्या रॅगिंग बाबतीत गणेशने कुंटुबाला माहिती दिली होती. गणेशच्या वडिलांनी महाविद्यालयातील प्रशासनाला व संबंधित प्राध्यापकांनाही तोंडी तक्रार दिली होती. मात्र महाविद्यालयाकडून यानंतर कसलाच त्रास होणार नाही याची काळजी घेऊ म्हणून सांगण्यात आले होते. मात्र त्यात फरक पडला नाही त्यामुळे गणेशने टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान रॅगिंगचा मात्र त्रास सुरुच असल्याने तसेच वडिलांच्या स्वप्नाचं दडपण यामुळे मानसिक तणावात असलेल्या गणेशने गावी येवून विष पिवून आत्महत्या केल्याचे गणेशचे काका राधाकिसन म्हेत्रे यांनी सांगितले. यावर महाविद्यालय प्रशासनाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.रॅगिंग मुळे गणेशच्या आई वडिलाचे मुलाला डॉक्टर झालेलं पाहण्याचे स्वप्न भंगले.

या बाबतीत महाविद्यालय प्रशासन आणी रँगिंग करणाऱ्यावर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली. बीड तालुक्यातील नाळवंडी येथील गणेश म्हेत्रे हा शेतकरी कुटुंबातील मुलगा लातूर जिल्ह्यात उदगीर येथे धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयात बी.ए.एम.एस. च्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. मुलाने डॉक्टर व्हावे यासाठी वडिलांनी कर्ज काढून फी भरली होती. गणेश देखील जिद्दीने वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे म्हणून शिक्षण घेत होता मात्र महाविद्यालयातील काही सिनियर्सकडून सतत टोमणे आणी घालून पाडून बोलल जात होतं. हा प्रकार वारंवार होत असल्याचं त्याने नातेवाईकांना बोलून दाखवले होते.  या प्रकाराबाबत महाविद्यालयात त्याच्या वडिलांनी तोंडी तक्रार केली होती.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!