Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दिल्लीची हवा : ७० जागांसाठी ५५ टक्क्यांहून अधिक मतदान , एक्झिट पोलची हवा “आप ” कडेच….

Spread the love

नवी दिल्ली विधानसभेसाठी दिल्लीत आज एकूण ७० जागांवर मतदान झाले. दिल्लीत ५५ टक्क्याहून अधिक मतदान झाल्याने राज्यात कुणाची सत्ता येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र, सर्वच वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या एक्झिट पोलमुळे राज्यात पुन्हा एकदा आम आदमी पार्टीचंच सरकार येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या निवडणुकीचे मतदान संपते न संपते तोच आता वेगवेगळ्या वाहिन्यांचे आणि वृत्तसंस्थांचे एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आहे. सर्वच एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार दिल्लीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचं सरकार येणार आहे. या  एक्झिट पोलनुसार ‘आप’ला बहुमत मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार भाजपला मोठा फटका बसणार असून त्यांना अपेक्षित जागाही मिळताना दिसत नाहीत. तसेच काँग्रसेचं दिल्लीत पुन्हा पानीपत होताना या एक्झिट पोलमधून दिसत आहे.

टाइम्स नाऊच्या सर्व्हेनुसार आपला ४७ तर भाजप आघाडीला केवळ २३ जागा मिळताना दिसत आहेत. एबीपी सीव्होटर्सच्या सर्व्हेनुसार आपला ५६, भाजप आघाडीला १२ आणि काँग्रेस आघाडीला केवळ दोन जागा मिळणार असल्याचं दिसून येत आहे. तर जन की बातच्या सर्व्हेत आपला ५५ आणि भाजप आघाडीला केवळ १५ जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. न्यूज एक्स नेतानेही आपला ५५ जागा दिल्या असून भाजप आघाडीला १४ जागा दिल्या आहेत. तर काँग्रेसल अवघ्या एका जागेवर विजय मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. इंडिया न्यूज नेशन सर्व्हेनेही आपला ५५ जागा दिल्या असून भाजप आघाडीला १४ जागा दिल्या आहेत. तर काँग्रेसला  अवघ्या एका जागेवर विजय मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. न्यूज एक्स-पोलस्टारच्या सर्व्हेत आपला ५६ जागा आणि भाजपला १४ जागा दाखविल्या आहेत. सुदर्शन न्यूजने आपला ४२, भाजप आघाडीला २६ आणि काँग्रेसला दोन जागा दाखविल्या असून इंडिया टीव्हीने आपला ४४ आणि भाजप आघाडीला २६ जागा दाखविल्या आहेत. एबीपी न्यूज-सी व्होटर्स, न्यूज एक्स-नेता, इंडिया न्यूज नेशन आणि सुदर्शन न्यूज वगळता इतर वृत्तवाहिन्यांनी काँग्रेसला एकही जागा दिलेली नाही. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसला दोन आकडी संख्या गाठता आलेली नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!