Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जेएनयू हिंसाचाराचा विरोध करणाऱ्या १७ आंदोलकांना अटक

Spread the love

गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी जानेवारी महिन्यात जेएनयूमधील हिंसाचाराचा विरोध करणाऱ्या आंदोलकांपैकी १७ जणांना कुलाबा पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. जालन्यात नागरिक सुधारणा कायदा आणि सीएए विरोधातील आंदोलनात प्रक्षोभक भाषण करणाऱ्या मोहम्मद सलमान याला कुर्ला येथून पकडण्यात आले आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात जानेवारी महिन्यात काही संघटनांनी आंदोलन केले होते. याठिकाणी विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालीद देखील हजार होता. यावेळी बेकायदा आंदोलन केल्याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग आणि कुलाबा पोलिस ठाण्यात ६० पेक्षा अधिक जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांकडून या आंदोलकांना हजर राहण्यासाठी समन्स पाठवण्यात आले होते. त्यानुसार यापैकी १७ आंदोलकांना अटक करून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी जालना येथे सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक टाळण्यासाठी मुंबईतील कुर्ला येथे लपलेल्या मोहम्मद सलमान याला जालना पोलिसांनी मुंबई गुन्हे शाखेच्या मदतीने अटक केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!