Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महिलेवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचा खून , मयताविरुद्ध बलात्काराचा तर जमावाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

Spread the love

वर्धा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील महिलांच्या जळित प्रकरणावरून राज्यात संतप्त भावना व्यक्त होत असतानाच  अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात एका ५५ वर्षीय महिलेवर बलात्काराची घटना घडल्यानंतर संतापलेल्या पीडितेच्या नातेवाईकांनी नराधमाला मारहाण करून ठार मारले आहे. या प्रकरणी राजूर पोलिसांत अत्याचाराचा आणि खूनाचा असे दोन गुन्हे दाखल झाले आहे.

याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि , अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील शिरपुंजे गावात एका ५५ वर्षीय महिलेवर गावातीलच ४५ वर्षीय राजू गणपत सोनवणे या व्यक्तीने अत्याचार केला. यावेळी पीडित महिलेने सदर घटना घरी सांगितल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी सदर आरोपीला गावात मारहाण केली. आरोपी पळून जावू नये म्हणून दगडी बाकाला बांधून ठेवले आणि  मारहाण केली. त्यानंतर आरोपीला पोलीस स्टेशन राजूरला आण्यात आलं. जखमी अवस्थेत असलेल्या आरोपीला पोलिसांनी राजूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केलं. परंतु, प्रकृती गंभीर असल्यानं नाशिकला हलवण्यात आलं होतं. मात्र, रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.  या प्रकरणी राजुर पोलीस स्टेशनमध्ये महिलेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीच्या हत्येप्रकरणी खूनाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान पहिल्या गुन्ह्याबाबत पीडित ५५ वर्षीय महिलेनं फिर्याद दिली असून यात म्हटलं आहे की, ४ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास जायणावाडी गावच्या शिवारात खंडोबाचे माळावर जणावरं चारण्यासाठी गेलेली असताना आरोपी राजू गणपत सोनवणे ( वय ४५रा.शिरपुंजे) याने  आपल्यावर अत्याचार केला. या प्रकरणी मयत आरोपीवर गु.र.न.३१/२०२०भा.द.वी.कलम ३७६अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस पाटलांनी दिलेल्या फिर्यादीवरून, ४ फेब्रुवारी २०२० रोजी शिरपुंजे येथील महिलेवर अत्याचाराच्या घटनेनंतर दुपारी २ ते ४ वाजेच्या दरम्यान, सदर घटनेचा राग मनात धरून तीन जणांनी आरोपी राजू सोनवणे याला जबर मारहाण केली होती. त्यात तो मयत झाला. या फिर्यादीवरुन तीन जणांविरुद्ध गु.र.न.३७/२०२० भा.द.वी.कलम ३०२,३४ प्रमाणे खूनाचा गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितिन पाटील करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!