Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“बुद्धभूमी” मावसाळा येथे विसाव्या धम्म परिषदेचे आयोजन : भदन्त एस. प्रज्ञाबोधी महाथेरो

Spread the love

जगप्रसिद्ध ऐतिहासिक वेरूळ येथील बुद्ध लेणी पासून जवळच असलेल्या नावारूपास असलेली “बुद्धभूमी” मावसाळा ता. खुलताबाद जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी “अखिल भारतीय बौद्धधम्म ज्ञानसागर प्रसारक मंडळ” या संस्थेच्या आणि संपूर्ण उपासक-उपासिका यांच्यावतीने दरवर्षाप्रमाणे याहीवर्षी दिनांक ९ फेब्रुवारी २०२० रविवार रोजी “विसावी धम्मपरिषद संपन्न होत असल्याची माहिती भदन्त एस. प्रज्ञाबोधी (महाथेरो यांनी दिली आहे”

याविषयी माहिती देताना त्यांनी म्हटले आहे कि , “माघ पौर्णिमेच्या” मंगलमय दिनी  भगवान बुद्धाने आपले स्वतःचे महापरिनिर्वाण जाहीर केले होते की,  आज पासून माझे तीन महिन्यांनी महापरीनिर्वाण होणार असे आपले स्वतःचे महापरिनिर्वाण ज्या “पौर्णिमेला जाहीर केले” ती पौर्णिमा म्हणजेच “माघ पौर्णिमा” ती माघ पौर्णिमा धम्मामध्ये, साहित्यामध्ये, बौद्ध राष्ट्रांमध्ये “आयुपौर्णिमा” म्हणून साजरी करतात तीच पौर्णिमा म्हणजेच “माघ पौर्णिमा” गेल्या वीस वर्षापासून प्रसिद्ध “बुद्धभूमी मावसाळा” ता.खुलताबाद या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहा मध्ये धम्म परिषदेचे आयोजन करून “माघ पौर्णिमा” साजरी करतो आतापर्यंत मावसाळा ता. खुलताबाद या ठिकाणी एकोनावीस धम्मपरिषदा मोठ्या उत्सहा मध्ये संपन्न झाल्या ज्याची देश विदेशामध्ये नोंद घेण्यात आली म्हणूनच भदंत प्रा. सुमेधबोधी (महास्थवीर ) यांच्यावतीने थायलँड देशाच्या राजाने “सोन्याच्या कलशामध्ये” भगवान बुद्धाच्या अस्थी या सेंटरसाठी कायमस्वरूपी २०१४ पासून दान दिल्या ही धम्मपरिषद दिनांक ९ फेब्रुवारी २०२० रविवार रोजी “विसावी धम्मपरिषद संपन्न होत आहे”

या विसाव्या बौद्ध धम्म परिषदेला देश-विदेशातील बौद्ध भिक्षु बौद्ध विचारवंत विचारवंत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत त्याचप्रमाणे या विशाल बौद्धधम्म परिषदेमध्ये महाकारूणीक तथागत भगवान बुद्ध यांच्या “अस्थिधातू कलश दर्शनासाठी” ठेवण्यात येणार आहे या धम्म परिषदेचे उद्घाटक म्हणून आयु.माधवराव बोरडे ( शिक्षणमहर्षी) तर अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय भिक्खू संघाचे प्रचारमंत्री पूज्य भदंत प्रा. सुमेधबोधी ( महास्थवीर )तसेच महाधम्म ध्वजारोहन थायलंड येथील भदंत बोनथासम्मक (थायलंड ) यांच्या हस्ते होईल. महाधम्मध्वजाला “समता सैनिक दल शाखा औरंगाबाद” च्या वतीने सलामी देण्यात येईल तसेच थायलंड, श्रीलंका,, आसाम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगणा बुद्धगया, सारणाथ, कुशीनगर, मुंबई, नाशिक, पुणे, अमरावती, औरंगाबाद, येथील बौद्धभिक्षू आणि उपा. सुधाकर बनाटे ( शिक्षण उपसंचालक औरंगाबाद विभाग औरंगाबाद) माननीय प्रशांत बंब (आमदार), माननीय संजय शिरसाट( आमदार), आयु, राहुल गायकवाड (तहसीलदार) उपासिका अर्चनाताई अंभोरे आणि आयु. दिनेश अंभोरे( सभापती ) आयु.डॉ. अशोक पारधे, आयु.जी बी सातदिवे, आयु. नरेन्द्र तेजाळे, आयु.डॉ. दिपक गायकवाड, आयु.ऍड. एस. आर. बोदडे, आयु. ऍड. अनिल सांदनशीवे, आयु. पी.एन.परतवाघ आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत सायंकाळी महाराष्ट्राचे ख्यातनाम टी व्ही स्टार, रेडिओ स्टार भिमशाहीर “विलास पाचारणे” यांचा कार्यक्रम होणार तरी आपण हजारोच्या संख्येने या विशाल बौद्धधम्म परिषदेमध्ये उपस्थित राहून “भगवान बुद्धाच्या अस्थी” दर्शनाचा व धम्मज्ञाना चा लाभ घ्यावा असे आव्हान मुख्य आयोजक:- भदन्त एस. प्रज्ञाबोधी (महाथेरो), भदन्त सागरबोधी भदन्त रट्टपाल, भन्ते आनंद, भन्ते रेवत यांनी केले आहे अधिक माहितीसाठी 8007174 657 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!