Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : शाळेतल्या विद्यार्थिनीला अश्लिल व्हिडिओ दाखविल्याचा गंभीर प्रकार, कारवाईसाठी पालकांचे आंदोलन

Spread the love

औरंगाबाद शहराच्या  सिडको भागातील  मुकुल मंदिर शाळेतील सातवीच्या विद्यार्थिनींना शाळेतील शिक्षकानेच  अश्लिल व्हिडिओ दाखविल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. किरण परदेशी असे शिक्षकाचे नाव आहे.

दरम्यान शाळेतील विद्यार्थिनींना अश्लिल व्हिडिओ दाखविणाऱ्या शिक्षकाला पाठिशी घालणाऱ्या मुकुल मंदिर संस्थाचालकांविरोधात मुख्याध्यापकांना पालकांनी मंगळवारी घेराव घातला. सात दिवसांपूर्वी पोलिस आयुक्तांना तक्रार देवूनही टाळाटाळ होत असल्याने संतापलेल्या पालकांनी पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करा, शिक्षकावर कारवाई करा ही मागणी करत ठिय्या मांडला. सायंकाळपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. याबाबत या शिक्षण संस्थेचे पदाधिकारी माजी मंत्री  आमदार अतुल सावे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि , शाळेच्या कामकाजात माझा सहभाग नसतो मात्र मला मिळालेल्या माहितीनुसार संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कळते.

या प्रकरणाबाबत तक्रार होऊनही संस्थाचालकांकडून शिक्षकालाच पाठिशी घातले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पालकांकडून पोलिसांकडेही तक्रारपत्र देण्यात आले होते. मात्र, पालकांनी केलेल्या आरोपावरून या प्रकाराबाबत संबंधित शिक्षकाला पाठबळ दिला जात असल्याने गुन्हा दाखल करण्याबाबत टाळाटाळ होत असल्याने मंगळवारी पालकांनी शाळेवर धाव घेतली आणि  मुख्याध्यापक सुरेश परदेशी यांना घेराव घालत जाब विचारला. त्यानंतर सिडको पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांकडून करण्यात आली.

मुकुल मंदिर हि शहरातील एक  नामांकीत शाळा असून भाजपचे आमदार माजी राज्यमंत्री अतुल सावे यांच्याशी हि संस्था निगडीत  आहे. त्यांचे बंधू अनिल सावे हे संस्थेचे अध्यक्ष तर सचिव गंगाधर गिरगांवकर हे आहेत. शाळेतील या प्रकाराबाबत ७ जानेवारी रोजी अध्यक्षांना मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे पत्र लिहण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पालकांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेतील तीन विद्यार्थिनींना किरण परदेशी या शिक्षकाने आक्षेपार्ह व्हिडिओ दाखविले असल्याची माहिती या मुलींकडून महिला शिक्षकांना मिळताच त्यांनी हि बाब मुख्याध्यापकांच्या कानावर घातली परंतु यावर कुठलीही ठोस कारवाई  करण्यात आली नाही. केवळ किरण परदेशी यांची केवळ शिफ्ट बदलण्याचे आदेश दिले.  विशेष म्हणजे दि. ७ जानेवारी ते ४ फेब्रुवारी एवढ्या दरम्यान संस्थेकडून कोणतीच कारवाई का झाली नाही, पोलिसांना तक्रार दिल्यानंतरही अद्याप कारवाई का नाही, असा प्रश्न पालकांनी  उपस्थित केला आहे.

लहान मुलांसोबत विकृत चाले करणाऱ्या विकृत आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

दरम्यान भिवंडी शहरातील आदर्श पार्क परिसरात लहान मुलांसोबत विकृत चाळे करणाऱ्या एका विकृताला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. लहान मुलांनी पालकांना सांगितल्यानुसार  सीसीटीव्हीत हा धक्कादायक प्रकार कैद झाला आहे. आदर्श पार्क परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीतील काही लहान मुले इमारत परिसरात कुत्र्यासोबत खेळत होती. त्यावेळी डोक्यावर टोपी घालून हा विकृत त्या ठिकाणी आला. आपले गुप्तांग बाहेर काढून या विकृताने लहानमुलांसोबत लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. घरी गेल्यानंतर पालकांनी रात्री झोपताना मुलांचे कपडे बदलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलांनी कपडे बदलण्यास नकार देत अंकल येईल, असे म्हटले. मुलांच्या या वक्तव्यामुळे पालक सावध झाले. त्यांनी मुलांना विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. मुलांनी माहिती दिल्यानंतर पालकांनी सीसीटीव्हीमधील रेकोर्डिंग तपासले. त्यावेळी विकृताने केलेले घाणेरडे चाळे समोर आले. त्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून आरोपी शांतीलाल जैन याला अटक केली. त्याच्याविरोधात भादंवि ३५४ व पॉस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!