Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“माझ्या मुलीला जाळले तसे त्यालाही जाळून टाका…” पीडितेच्या आईचा आक्रोश… आरोपीला पोलीस कोठडी , संतप्त नागरिकांचा मोर्चा

Spread the love

राज्यात सर्वत्र  निषेध होत असलेल्या हिंगणघाट जळीत प्रकरणातील शिक्षिका मृत्यूशी झुंज देत असून तिची प्रकृची नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, माझ्या मुलीची ही अवस्था करणाऱ्यालाही जिवंत जाळा, त्या मुलालाही त्याच वेदना व्हायला हव्यात, असे संतप्त उद्गार पीडितेच्या आईने काढले आहेत. या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या असल्याचे शासकीय सूत्रांनी म्हटले आहे. तर गृहमंत्री अनिल देशमुख त्यांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्यात येईल असे म्हटले आहे.

हिंगणघाट जळीतकांडातील आरोपी विकेश नगराळे याला तत्काळ फाशी द्या या मागणीसाठी वर्ध्यात संतप्त नागरिकांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मोर्चा शेकडो नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्तेही सहभागी झाले होते. हिंगणघाट येथील नंदोरी चौकात अंगावर पेट्रोल ओतून या शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणारा आरोपी विकश नगराळे याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. या वेळी न्यायालयाने आरोपीला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

दरम्यान, मृत्यूशी झुंज देणाऱ्या पीडित शिक्षिकेवर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून उपचारासाठी पीडितेला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या आगीत पीडित पूर्णतः होरपळली असून तिचा चेहरा भाजला आहे. डॉक्टरांनी या शिक्षिकेला कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!