Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : लिपीकाचा १६ लाखांचा अपहार,गुन्हा दाखल, आरोपी फरार

Spread the love

औरंगाबाद – आरोग्यभवनातील कुष्ठरोग विभागाच्या कारकुनाने सहाय्यक संचालकांच्या सह्या करुन कार्यालयाच्या खात्यातून १५लाख २९हजार ३५६रु.चा अपहार केला. या प्रकरणी कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक डाॅ.विलास विखे यांच्या तक्रारी वरुन वेदांतनगर पोलिस ठाण्यात शनिवारी गून्हा दाखल करण्यात आलेला आहे.

बी.एन. दांडगे असे आरोपी कारकुनाचे नाव असून गुन्हा दाखल होताच तो फरार झाला आहे.वरील भ्रष्टाचार डाॅ.विखे यांच्या लक्षात आल्यानंतर गेल्या दोन वर्षाचे रेकाॅर्ड डाॅ. विखेंनी तपासले.
आरोग्यभवनातील अवैद्यकीय सहाय्यकांचे प्राॅव्हिडंड फंड, व वेतनातून परस्पर कपात करण्यात आरोपी बी.एन. दांडगे याचा चांगला सराव झाला आहे. डाॅ. विखेंचे कार्यालयीन सहकारी परभणे, गिरी यांनी त्यांच्या पगारातील रकमा परस्पर वजा का केल्या जात आहेत. असा अर्ज केल्यानंतर डाॅ. विखेंच्या हा प्रकार लक्षात आला.आरोपी बी.एन. दांडगे हा २०११साला पासून औरंगाबाद आरोग्य भवनात कार्यरत आहे. व तेंव्हापासून तो अपहाराचे उद्योग करतो असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघंड झाले आहे. त्याच्या सोबंत या प्रकरणात आणखी किती लोक सहभागी आहेत. याचा पोलिस तपास करंत आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय.डुकरे करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!