Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Budget 2020 Live With Loksabha : S.C. साठी 85 हजार कोटी S.T. साठी 53 हजार 700 कोटींची तरतूद

Spread the love

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी ११ वाजता २२०-२१ च्या अर्थसंकल्प वाचनास प्रारंभ केला असून या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण  देशाचे लक्ष लागले आहे. देशातील ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरुन विरोधकांकडून सरकारवर मोठी टीका केली जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही सगळी आव्हाने देशाच्या नव्या अर्थसंकल्पात देशातील  आर्थिक मंदी , रोजगार समस्या, शेतकरी, व्यापारी , उद्योजकांचे प्रश्न यावर अर्थसंकल्पात सरकारने नेमकी काय तरतूद केली आहे ? या विषयी सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे.  या सादरीकरणास आता सुरुवात झाली आहे.


 

  • मागासवर्गीयांसाठी ८५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अनुसूचित जाती जमातींसाठी ५३ हजार ७०० कोटींची तरतूद कऱण्यात आली आहे.

  • ग्रामीण भागात इंटरनेटचं जाळं पसरविण्यात येणार असून भारत नेट योजनेद्वारे गावांमध्ये इंटरनेट पसरवलं जाणार आहे. यासाठी 6 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

  • उडान योजने अंतर्गत नव्या १०० विमानतळांची निर्मिती.

  • दिल्ली मुंबई एक्स्प्रेस वे २०२३ पर्यंत पूर्ण करणार अशीही घोषणाही निर्मला सीतारामन यांनी केली. तसेच २ हजार किमीचे सागरी रस्ते बांधले जाणार असेही निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

  • उद्योगांसाठी २७ हजार ३०० कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. तर पायाभूत सुविधांसाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आल्याचंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं.

  • शिक्षण क्षेत्रासाठी ९९ हजार ३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली आहे. स्कील डेव्हलपमेंटवर ३ हजार कोटी खर्च करणार असल्याचंही निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.

  • कृषी आणि सिंचनासाठी २०८३ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे.  विविध योजनांची घोषणा करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. कृषि आणि सिंचन क्षेत्रासाठी २.८३ लाख कोटी रूपयांची तरतूद करून सीतारामन यांनी शेतकऱ्यांची मने जिंकली.

हमारा वतन खिलते हुए शालीमार बाग जैसे. हमारा वतन डल लेक में खिलते हुए कमल जैसा. नौजवानों के गरम खून जैसा. मेरा वतन तेरा वतन हमारा वतन दुनिया का सबसे प्यारा वतन.

–   केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात केली आहे. मोदी सरकारला जनतेने बहुमत देऊन निवडून दिलं याबाबत त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.

  • गरीब विद्यार्थ्यांसाठी पदवीपर्यंत ऑनलाईन शिक्षणाची सोय करणार

  • स्वच्छ भारत योजनेसाठी 12 हजार 300 कोटींची तरतूद

  • 60 लाख नवे करदाते निर्माण झाले. आयुष्मान योजनेचा फायदा भारताला मोठ्या प्रमाणावर झाला. अनेक योजनांमुळे ग्रामीण भागातल्या लोकांना लाभ झाला.

  • किसान रेल योजना सुरू करून दूध, मांस, मासे वाहतूक करणे सुसह्य करणार अशी घोषणाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.

  • अन्नदाता उर्जादाता बनवण्यावर आम्ही भर देणार आहोत. जलसंकटात असलेल्या 100 जिल्ह्यांना अर्थसहाय्य देणार आहोत असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं. शेत जमिनींचा वापर चांगल्या पद्धतीने करुन अधिक उत्पन्न कसं घेता येईल यावर आमचा भर असणार आहे असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.

  • शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.  विमा योजनेतून शेतकऱ्यांना लाभ मिळतो आहे. असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं. प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहचवण्यात यश आलं आहे. आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत करावी लागेल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांसाठी आम्ही 16 कलमी कार्यक्रम आणतो आहोत. ज्याद्वारे शेतकऱ्यांची प्रगती करणाऱ्यावर भर दिला जाईल. सौर उर्जेवर शेती पंप सुरु केले आहेत. आणखी 15 लाख शेतकऱ्यांना सोलार पंप देणार असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं.

  • अर्थसंकल्पात गरीबांसाठी विविध योजना आहेत असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं. सबका साथ सबका विकास हे या सरकारचं सूत्र आहे. याचाच विचार अर्थसंकल्पातही करण्यात आला आहे असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं.

  • एप्रिल 2020 पर्यंत जीएसटीचं नवं व्हर्जन येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. 27 कोटी लोक दारिद्र्यरेषेबाहेर आले असंही त्यांनी यावेळी सांगितलं. महागाईवर नियंत्रण ठेवण्यात आम्हाला यश आलं असंही त्या म्हणाल्या.

  • आपल्या देशातील बँकांची स्थिती सुधारली. बँक व्यवस्था सुधारण्यात आम्हाला यश आलं. देशातील इन्स्पेक्टर राज संपवण्यात यश आलं. असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे

  • जीएसटी कर लागू करणं हे देशाच्या प्रगतीसाठी एक ऐतिहासिक पाऊल होतं असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. तसंच महागाई नियंत्रणात ठेवण्यात आम्हाला यश आलं असंही त्या म्हणाल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!