Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजपशी संबंधित लोकांनीच भीमा कोरेगाव घडविल्याने तपास एनआयएकडे , राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख त्यांची प्रतिक्रिया

Spread the love

भाजपशी संबंधित लोकांनीच भीमा कोरेगाव हिंसाचार घडविल्यामुळेच या प्रकरणाचा तपास  एनआयएकडे देण्यात आल्याचा आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय. ‘न्यूज१८ लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला. अनेक संघटना आणि लोकांनी माझी भेट घेऊन त्यांनीही हेच मत व्यक्त केलं होतं. त्यामुळे आपली काळी कृत्य उघडकीस येवू नयेत म्हणून केंद्र सरकारने ही कृती केल्याचंही ते म्हणाले. भीमा कोरेगाव प्रकरण तपास प्रकरणाचा वाद आणखी पेटण्याची चिंन्हे आहेत.

या मुलाखतीत बोलताना देशमुख पुढे म्हणाले कि , या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा अशी मागणी शरद पवारांनी केली होती. त्याचबरोबर इतर अनेक संघटनांनीही अशीच मागणी केली होती. सरकार त्या दृष्टीने पुढे जात असतानाच केंद्राने हे पाऊल उचलणे हे चुकीचं आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं. भाजपची सत्ता असतानाच्या काळात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यामुळेच गृहमंत्रालयाने या प्रकरणी तपासाचा आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं.

शासनाच्या आदेशावरून राज्य पोलिसांचा सायबर सेल आता या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. राजकारणात विरोधी पक्षांच्या तंबूत काय चाललंय याची खबरबात काढून घेण्यासाठी अशा प्रकारचे फोन टेप केले जातात असं कायम बोललं जातं. नियमानुसार फक्त न्यायालयाच्या परवानगीनेच अशा प्रकारे फोन टॅपिंग केलं जावू शकतं. राजकारणासाठी फोन टॅप केले जावू शकत नाहीत. यात काही तथ्य आढळलं तर भाजपचे नेते अडचणीत येवू शकतात.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!