Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

१० हजारात १५ दिवसाचे बाळ विकणारे माता आणि त्याच बाळाला कुंटणखान्यात विकणाऱ्या दलालांना रंगेहाथ पकडण्यात मुंबई पोलिसांचे यश !!

फाईल चित्र । प्रतिकात्त्मक

Spread the love

मातृत्वाला आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना…

पैशाच्या लालसेने झटपट श्रीमंत होण्यासाठी १५ ते २० दिवसाच्या बाळाला कुंटणखान्यात  विकण्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना मुंबई पोलिसांनी उघडकीस आणली आहे. हे बाळ  विकणाऱ्यांना सापळा रचून रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार वेश्या व्यवसायासाठी नवजात बालकाची विक्री करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हे आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. वेश्या व्यवसायात आणण्यासाठी हे आरोपी नवजात बालकाची बिहारमधून तस्करी करून मुंबईत आणत आणि त्यांची विक्री कुंटन खान्यात करत होते. बांद्रा पश्चिम येथील कुरेशी नगरमध्ये काही व्यक्ती नवजात बालकाला घेऊन वेश्या व्यवसायात विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला आणि आरोपींना अटक केली.

याप्रकरणी पोलिसांनी दोन  वेश्या दलाल महिलांसह एका पुरुष दलालाला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून १५ ते २० दिवसांचे नवजात बाळ हस्तगत केल आहे. तपासात हे बाळ बिहारमधील एका महिलेने जन्म दिल्यानंतर केवळ दहा हजार रुपयांना विकले होते. दहा हजाराच्या मुलीचा सौदा केल्यानंतर तिला कुरेशी नगर येथे आणण्यात आले होते. याच ठिकाणी तिची वाढ करून त्यानंतर तिला वेश्याव्यवसाय ढकलण्यात येणार होते यासंदर्भात मुंबई पोलीस अधिक तपास करीत असून या टोळीमध्ये आणखीन किती जण  आहेत याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, अश्या प्रकारे नवजात बालकाला नरकात ढकलून त्यांचे बालपण तर हिरावून घेतलेच जाते. पण त्याचबरोबर संपूर्ण आयुष्य नरक यातना भोगाव्या लागतात. ज्या आईने थोड्या पैशाकरता आपल्या पोटच्या गोळ्याला विकले तिला आई तरी का म्हणावे? असा संतप्त सवाल आता विचारण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!