स्वतःच्या खुर्चीवर भैरवाची प्रतिष्ठापना तर पाच वर्षे जमिनीवर बसून करणार कारभार , सरपंच अजाबरामाचा “अजब” निर्णय …

Advertisements
Advertisements
Spread the love

रामायणात प्रभू रामचंद्र वनवासात गेल्यानंतर त्यांचा भाऊ भरतने त्यांच्या गैरहजेरीत राज्य कारभार चालवताना सिंहासनावर रामाच्या पादुका ठेवल्याचे सर्वांना माहित आहे पण आधुनिक काळात राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील रेवददरचे नवनिर्वाचित सरपंच अजबाराम चौधरी यांनी सरपंचपदाची सूत्र स्वीकारताना अजब कृती करून सर्वांनाच चकित केले आहे . या अजाबरावांनी पदभार स्वीकारताना चक्क आपल्या खुर्चीवर त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या भैरवाच्या मूर्तीला विराजमान केले आहे तर स्वतः कधीही खुर्चीवर बसून कारभार न करता सर्व ग्राम पंचायत सदस्यांसोबत खाली जमिनीवर बसण्याचा निर्णय जाहीर केला असल्याने हे अजाबराव चांगलेच चर्चेत आले आहेत.

Advertisements

अजबाराम चौधरी यांचा हा अजब निर्णय ऐकून ग्रामस्थांनी त्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले कि , आपण गावाचे सरपंच असलो तरी आपण सर्वांना समान मानतो या समानतेच्या भावनेतूनच आपण हा निर्णय घेतला आहे. काही लोकांनी यावर आक्षेप घेत ही अंधश्रद्धा असल्याचे सांगितले आहे. तर त्यांनी लोकांच्या लक्षात राहण्यासाठी आपण हे पाऊल उचलले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.शिवाय अजबाराम चौधरी यांनी ग्राम विकास अधिकाऱ्यांना सांगितले की, ‘कोणत्याही कारणास्तव मला पंचायतीत येण्यास शक्य झालं नाही तर सकाळ-संध्याकाल काळभैरव यांची पूजा नियमित झाली पाहिजे.’

Advertisements
Advertisements

अजाबराम पुढे म्हणाले कि , आपल्या अनेक कामासाठी सामान्य जनता पंचायतीत येते, तेव्हा ते खूर्चीत बसण्यासाठी संकोच व्यक्त करतात. शिवाय वृद्ध व्यक्ती देखील उभेच राहतात. म्हणून सर्वसामान्यांच्या भावनांचा आदर करत त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कधीच खुर्चीत विराजमान हेणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. बाकी भैरवाचा विषय आपल्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे तो सुद्धा माझं निर्णय आहे. अजाबराम त्यांच्या या अजब व्यवहारामुळे बातमीचा आणि चर्चेचा विषय झाला आहेत.

आपलं सरकार