सीएए आणि एनआरसीच्या मुद्यांवर दीपक निकाळजे यांचा बाळासाहेब आंबेडकर यांना पाठिंबा

औरंगाबाद – रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडीया (ए) हे पक्षाचे अधिकृत नाव केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरुन स्वता: स्थापन केलेल्या पक्षासाठी वापरत असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडीया (ए) चे राष्र्टीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान सी.ए.ए. आणि एन.आर.सी. विरोधात आमचा वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकरांना पाठींबा असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना निकाळजे म्हणाले , १९९०साली रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडीयाची स्थापना झाल्यानंतर २००४साली आपण पक्षातर्फे विधानसभा निवडणूक लढवत होतो. त्यावेळेस पक्षाचे राज्य उपाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत होतो. पण आरपीआय च्या मुंबई शहर अध्यक्षांनी आपल्याला पक्षातून काढून टाकल्याचे वृत्तपत्रातून वाचले असेही निकाळजे यांनी सांगितले. गेल्या वीस वर्षांपासून आपण आरपीआय ची इमाने इतबारे सेवा करंत आहोत. गेल्या १० नोव्हेंबर २०१९रोजी देशातल्या सत्तावीस राज्यातील पदाधिकार्यांनी गळ घातल्यामुळे आपण पक्षाचे अध्यक्ष झाल्याचा पुनरुच्चार निकाळजे यांनी केला. २००९ साली रामदास आठवले अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी २०१८ साली पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.म्हणून राज्य कार्यकारणीच्या बैठकीत पक्षाचा भावी अध्यक्ष म्हणून आपले नाव पुढे आले होते.
गेल्या २५ वर्षात आरपीआय चा कोणताही उमेदवार निवडून आला नाही. पक्षाला अधिकृत सिंबाॅल मिळाला नाही. निवडणूक आयोगाची मान्यता नाही.त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ होते.म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडीया (आंबेडकर) या नव्या पक्षाची स्थापना करण्याचे ठरवले होते. पण निवडणूक आयोगाने एकाच नावाचे दोन राजकिय पक्ष असल्याचा आक्षेप घेतला. आयोगाच्या या आक्षेपा विरोधात आम्ही न्यायालयात धाव घेण्याचे ठरवले व आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा निकाळजे यांनी व्यक्त केली.