Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : बनावट सोन्यावर कर्ज उचलणारे आणखी १० इसम निष्पन्न, ३ किलो बनावट सोन्यावर घेतले ६० लाख रु कर्ज

Spread the love

औरंगाबाद- खडकेश्वर परिसरातील नगर अर्बन काॅ.आॅप बॅंकेतून आणखी १० जणांनी ३किलो बनावट सोने बॅंकेकडे गहाण ठेवंत ५९लाख ८८ हजार गोल्ड लोन उचलले.अशी माहिती अटकेत असलेला बॅंकेचा व्हॅल्यूअर रमेश उदावंत याने गुन्हेशाखेला दिली.
या प्रकरणात उदावंत याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, सागर विनोद अग्रवाल रा.पिरबाजार,अजयसिंग विजयसिंग ठाकूर रा.बालाजीनगर, सुभाष सूर्यभान पवार रा.बीडबायपास, शेरखा चांदखाॅं पठाण रा.थेरगाव पैठण, दिपक सुधाकर आडाणी रा.पाचोड, विजय सांडू साबळै रा.बालाजीनगर,विजय कुंडलीकर रा.उस्मानपुरा, अटकेत असलेला सचिन शहाणे रा.बालाजीनगर,विष्णू हिंगे श्रेयनगर, अनिल काळे पिसादेवी या सर्वांना उदावंतने ५९लाख ८८ हजार गोल्ड लोण मिळवून दिले.या सर्व दहा इसमांकडून ६४ लाख ५८हजार ४१२ रु. येणे बाकी आहे. वरील तीन किलो सोन्याची पडताळणी गुन्हेशाखेने निष्णात व्हॅल्यूअर करुन इन कॅमेरा पूर्ण करुन अहवाल दिला.
वरील कारवाई गुन्हेशाखेचे प्रभारी सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीकांत नवले,पोलिस निरीक्षक मधुकर सावंत,एपीआय मनोज शिंदे पोलिस कर्मचारी विलास वाघ, अप्पासाहेब खिल्लारी, विशाल पाटील, नितीन देशमुख यांनी पार पाडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!