Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : बांधकाम व्यावसायिक मोटरवारला बेड्या, दोन दिवसांची पोलिस कोठडी

Spread the love

औरंगाबाद – अंदाजे ४ कोटी रुपयाच्या  अफरातफरी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर दीड महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार  असलेल्या बांधकाम व्यावसायिक प्रदीप मोटरवारला चिकलठाणा पोलिसांनी आज सकाळी ९.३०  वा. जवाहरनगर परिसरातील खिवंसरापार्कमधून त्याच्या राहत्या घरातून अटक केली. दरम्यान पोलिसांनी मोटरवारला न्यायालयासमोर  हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

याविषयी अधिक माहिती अशी कि , २००७ साली शासकिय ग्रुप विमा योजनेअंतर्गत बांधकाम व्यावसायिक प्रदीप मोटरवारने न्यू तिरुमला व श्रीनिवास अशा दोन गृहनिर्माण संस्था स्थापन केल्या.तिरुमला संस्थेचा मोटरवार स्वता:अध्यक्ष होता.तर श्रीनिवास संस्थेचे अध्यक्षपद त्याने पत्नी अनुराधा ला केले होते.त्यानंतर सहकार क्षैत्राच्या नियमानुसार गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकार्‍यांना बांधकाम करता येत नसल्यामुळे मोटरवार दांपत्याने अध्यक्ष पदांचे राजीनामे दिले.व दोन्ही संस्थेचे बोगस सभासद नोंदणी करंत १कोटी ६७लाख रु.निधी मिळवून तो हडप केला.त्यानंतर २०१३साली आरोपी मोटरवारने स्वता:च्या आॅफिसमधे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना तिरुमला आणि श्रीनिवास या गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष व सचिव केले.तर टाईल्स दुकानदार,बांधकाम ठेकेदार यांना संस्थांचे सदस्य केले.व तसेच पिसादेवी परिसरात दीड एकरचा भूखंड संस्थेच्या नावाने खरेदी केला.पण ही खरेदी करंत असतांना सस्थांचे अध्यक्ष व सचिव असलेले स्वता:च्या कर्मचार्‍यांच्या बॅंक कर्जासाठी बोगस ठराव घेत अध्यक्ष व सचिवांच्या खोट्या सह्या केल्या.दरम्यान सहकार क्षेत्राने २००७ ते २०१६ या काळात वरिल दोन्ही संस्थांचे आॅडिट करंत तिरुमला व श्रीनिवास या गृहनिर्माण संस्थाच्या लेखा परिक्षणात अनियमतता असल्याबद्दल कागदोपत्री अध्यक्ष महेश सिंदाळकर आणि सचिव उमेश सुरडकर यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या व त्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला.

पिसादेवी येथील भूखंडाच्या सातबार्‍यावर अध्यक्षा ऐवजी मोटरकरचे नाव आढळले.म्हणून सिंदाळकर यांनी हा प्रकार मोटरवारच्या कानावर घालंत पोलिसांकडे धाव घेतली.त्यानंतर मोटरवारने पुन्हा बोगस सह्या ठोकून दोन्ही गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांचे खोटे संमती पत्र दिले.व देवगिरी नागरी सहकारी बॅकेतून पुन्हा दोन कोटी रु. कर्ज उचलले. सिंदाळकरांनी सप्टेंबर २०१८मधे या प्रकरणात चिकलठाणा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.म्हणून आरोपी मोटरवारने सिंदाळकर यांच्या विरोधात एका शहागंज मधील महिलेला विनयभंगाची तक्रार देण्यास भाग पाडले.तसेच घरी गुंड पाठवून त्यांच्या पत्नीशी गैरव्यवहार केला म्हणून सिंदाळकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता.पण मोटरवारने आॅक्टोबर २०१८ मधे सिंदाळकरांच्या घरी गुंड पाठवून गैरव्यवहार केल्याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे हे सिंदाळकरांची तक्रारच घेत नव्हते. हा प्रकार पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या कानावर गेल्यानंतर पोलिसआयुक्तांनी पोलिस निरीक्षक चंद्रमोरेंची कान उघडणी करंत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर सिंदाळकरांच्या कुटुंबियांशी मोटरवारने गुंडांमार्फत गैरव्यवहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

मोटरवारने कर्मचार्‍यांच्या नावे कोट्यावधी रु.ची अफरातफर केल्या प्रकरणी सिंदाळकरांनी न्यायालयात धाव घेतल्याचे समजताच चिकलठाणा पोलिसांनी ४ डिसेंबर २०१९रोजी मोटरवार विरुद्ध  गुन्हा दाखल केला. वरील प्रकरणात पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद,पोलिस उपायुक्त दिपाली धाटे, सहाय्यक पोलिस आयुसक्त डाॅ.नागनाथ कोडे चिकलठाणा पोलिस ठाण्याचे एपीआय महेश आंधळे पीएसआय शिंदे यांनी कारवाई पार पाडली

आपलं सरकार

Click to listen highlighted text!