Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धक्कादायक : खून प्रकरणातील आरोपीने काही महिलांसह २० मुलांना आपल्या घरात ठेवले ओलीस , गोळीबारात ३ जखमी ,पोलिसांची कारवाई जारी….

Spread the love

मुलीच्या वाढदिवसाचे निमित्त करून बोलावलेल्या २० लहान मुलांना उत्तरप्रदेशमधील फर्रुखाबादमधील मोहम्मदाबादमध्ये एका आरोपीने  ओलीस ठेवले असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. स्थानिक आमदार आणि काही अधिकाऱ्यांना बोलावण्याची मागणी या आरोपीने केली आहे. लहानग्यांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले कि , सर्वांना  सुखरूप बाहेर काढण्यासाठी आमचे रेस्क्यू ऑपरेशन जरी असून प्रसंगी एनएसजीची मदत घेण्यात येईल.

याबाबत अधिक माहिती अशी कि , मोहम्मदाबादमधील करसिया गावामध्ये  दोन वर्षांपूर्वी सुभाषने आपल्या एका नातेवाईकाचा खून केला होता. त्या गुन्ह्यात तो तुरुंगातही गेला. एक वर्षापूर्वी तो जामिनावर बाहेर आहे. आपल्या  १० वर्षाच्या  मुलीच्या वाढदिवसानिमित्त गावातील लहान मुलांना त्याने आपल्या घरी बोलावले होते. सगळी मुले दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्याच्या घरी दाखल झाली. त्यानंतर आरोपी सुभाषने घराचा दरवाजा बंद केला. सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास एक महिला आपल्या मुलाला घेण्यासाठी त्याच्या घरी गेली. तेव्हा मुलांना सोडणार नसल्याचे आरोपीकडून सांगण्यात आल्याने त्या महिलेने पोलिसांना तत्काळ याबाबतची माहिती दिली.

दरम्यान घटनेची माहिती कळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आवाहन केल्यानंतरदेखील सुभाषने कोणताच सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. मात्र, त्याने पोलिसांवर देशी बनावटीची पिस्तूलने गोळीबार सुरू केला. त्याशिवाय त्याने बॉम्बफेक देखील केली. या बॉम्बफेकीत घराजवळील एक भिंत ढासळली. यामध्ये दोन पोलीस जखमी झाले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांची आणखी कुमक घटनास्थळी दाखल झाली. आपण तुरुंगात असताना पत्नीसोबत गावातील काहींनी दुष्कर्म केले आहे. पोलिसांनी त्यांना समोर आणावे अशी त्याची मागणी आहे. पोलीस या प्रकरणात अधिक कारवाई करीत आहेत. पोलिसांनी या घराभोवती वेढा घातला आहे. सायंकाळपर्यंत पोलिसांना ओलिसांची सुटका करण्यात अपयश आले. ओलीस ठेवलेल्या मुलांची आणि महिलांची सुटका करण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाला बोलावण्यात आल्याची माहिती कानपूर मंडळाचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी दिली. आरोपी सुभाषने स्वत: घर बनवले आहे. त्याने मुलांना घरातील एका कोपऱ्यात लपवून ठेवले आहे. सुभाषने स्थानिक आमदाराला ही बोलवण्याची मागणी केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!