Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गरुद्वाऱ्यात खेटाखेटी करणाऱ्याची तापलेल्या तापसी पन्नूने “अशी” खोड जिरवली….

Spread the love

बॉलिवूडमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अभिनेत्री तापसी पन्नू हिने तिला स्पर्श करून तिची छेड  काढणाऱ्या एका व्यक्तीची चांगलीच खोड मोडली.  करीना कपूरच्या ‘व्हॉट वुमन वाँट २’ (What Women Want 2) या कार्यक्रमात आपल्यासोबत घडलेला हा प्रसंग तिने स्वतःच प्रसंग कथन केला. या प्रसंगात तिने गुरुद्वारामध्ये आपल्याला मागून स्पर्श करणाऱ्या एका व्यक्तीचे बोटं पकडून पिरगळली असल्याची आठवण तापसीने सांगितली.

आपला अनुभव सांगताना तापसी म्हणाली की, गुरुपुरबच्या काळाता आम्ही गुरुद्वारात जात असू. तिथे जेवण वाढणाऱ्या स्टॉल्ससमोर अनेकदा गर्दी असायची. बहुतेक वेळा अशा गर्दीत धक्काबुक्की होत राहायची. त्यामुळे आम्हाला त्याची सवयच झाली होती. मात्र एकेदिवशी वेगळाच प्रसंग घडला. गुरुद्वारात जातानाच आज काहीतरी चुकीचे घडेल, असे वाटत होते. त्यासाठी मी माझी मानसिक तयारी देखील केली होती. गर्दीतून चालत असताना कुणीतरी मला मागून स्पर्श करत असल्याची जाणीव झाली. सुरुवातील मी दुर्लक्ष केले मात्र पुन्हा एकदा स्पर्श होत असल्याचे मला जाणवलं.

तापसीने गुरुद्वारात मागून स्पर्श करणाऱ्या व्यक्तीचा हात पकडून त्याची बोटं पिरगळून टाकली होती. ज्यामुळे त्या व्यक्तीला कायमचा धडा मिळेल. तापसीने आठवण सांगितलेल्या या भागाचे प्रसारण एफएम १०४.८ वर होणार आहे. तापसी पन्नू ही लवकरच भारतीय महिला क्रिकेटपटू मीथाली राजच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. ‘शाब्बास मिथू’, असे या चित्रपटाचे नाव आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!