Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

देश : सीएए आणि एनआरसीच्या विरोधात नाटक बसविले , शाळा , संस्था आणि चौथीच्या विद्यार्थ्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा

Spread the love

कर्नाटकमधील बीदर येथील  शाहीन ग्रुपच्या शाळेतील  विद्यार्थ्यांनी सीएएच्या कथानकावर आधारित बसविलेल्या  नाटकामुळे शाळा आणि शाहीन एज्युकेशन इन्स्टीट्यूटविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सीएएविरोधात चौथीच्या मुलांचं एक नाटक बसवण्यात आलं होतं. या नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बीदर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी हे नाटक सादर करण्यात आलं होतं. यात चौथीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी नाटकात सीएए आणि एनआरसी  लागू झाल्यास मुस्लिमांना देशातून बाहेर काढण्यात येईल असे दाखवले. याशिवाय नाटकातील एक पात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात असभ्य भाषेत बोलताना दाखवण्यात आलं आहे. एकीकडे देशात वेगवेगळ्या भागात सीएएविरुद्ध आंदोलनं सुरू आहेतर तर दुसरीकडे कर्नाटकमधील बीदर येथील शाळेत सीएएविरोधात भाष्ट करणारं नाटक बसवण्यात आलं आणि यात मोदींचा अपमान करण्यात आला. हा कार्यक्रम पाहणारे प्रेक्षकही मुलांचं टाळ्या वाजवून प्रोत्साहन वाढवताना दिसले.

सदर कार्यक्रम पाहणाऱ्या एका व्यक्तिने संपूर्ण नाटक फेसबुकवर लाइव्ह केलं होतं. यानंतर नीलेश रक्शल्य नावाच्या व्यक्तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर शिक्षण संस्थेविरोधात कारवाई करण्यात आली. भारतीय दंड संहितानुसार कलम ५०४, ५०५ (२), १२४ ए, १५३ ए आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. एकीकडे अभाविपच्या समर्थकांनी संस्थेविरोधात कार्यवाई व्हावी अशी मागणी करत संबंधित व्यक्तींना अटक करण्याची मागणी केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!