Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जामिया विद्यापीठातील गोळीबार प्रकरणी अमित शहा यांची तीव्र प्रतिक्रिया , गोळीबार करणारा रामभक्त गोपाल , उजव्या विचारसरणीचा….

Spread the love

सीएए आणि एनआरसीच्या विरोधावरून सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान जामिया विद्यापीठात झालेल्या गोळीबार प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया दिली असून , असले प्रकार खपवून घेणार नसल्याचे म्हटले आहे. दोषीवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सुधारीत नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरोधात जामिया मिलियातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ ते राजघाट अशा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्या दरम्यान दुपारी अचानक गोळीबार झाल्यानंतर गोंधळ उडाला. हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला.

प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार जामियात गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचे नाव रामभक्त गोपाल असल्याचे समोर आले आहे. रामभक्त गोपाल हा उजव्या विचारसरणीच्या संघटनेचा कार्यकर्ता असल्याची चर्चा आहे. रामभक्त गोपाल याने गोळीबार करण्यापूर्वी काही फेसबुक पोस्टही लिहील्या. गोळीबाराच्या आधी जामिया मिलियातून त्याने फेसबुक लाइव्ह देखील केले होते. सोशल मीडियावर त्याचे प्रोफाइल व्हायरल झाल्यानंतर फेसबुकवरून हे प्रोफाइल हटवण्यात आले आहे.

थेट देशाच्या राजधानीत एका मोर्चावर थेट गोळीबार करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून गोळीबार करणाऱ्या दोषीला कठोर शिक्षा देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. अमित शहा यांनी म्हटले की, दिल्लीत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दिल्ली पोलीस आयुक्तांशी याबाबत चर्चा झाली असून दोषीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकार अशा कोणत्याही घटना खपवून घेणार नाहीत. या प्रकरणी गंभीरपणे कार्यवाही करणार असून दोषींना शिक्षा देण्यात येणार असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!