Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नागरिकत्व सुधारणा  कायद्याविरोधात चालू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण , २ ठार ३ जखमी

Spread the love

गेल्या दीड महिन्यांपासून नागरिकत्व सुधारणा  कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरू असून पश्चिम बंगालमध्ये नागरिकत्व संशोधन कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. या आंदोलनादरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील मुरशीबाद येथे सीएए आणि एनआरसी  विरोधात आंदोलन उगारले होते. येथे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

देशभरात केंद्र सरकारने सीएए लागू केल्यापासून विरोध प्रदर्शन सुरू आहे. हा कायदा मागे घेण्यात यावा यासाठी सीएए विरोधात अनेकांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. आता तर हा मुद्दा परदेशातही चर्चिला जात असून युरोपातील संसदेत या कायद्यावर चर्चा केली जाणार आहे. मात्र भारताने युरोपातील संसदेवरील चर्चेवर नाराजी व्यक्त केली होती. युरोपातील संसद भारताच्या नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात त्यांच्या काही सदस्यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर चर्चा आणि मतदान करणार आहेत. युरोपातील संसदेत या आठवड्याच्या सुरुवातीला युरोपियन युनायटेड लेफ्ट नॉर्डिक ग्रीन लेफ्ट  यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार सीएएवर चर्चा होणार असून याच्या एक दिवसानंतर मतदान करणार असल्याचे सांगण्यात आले होते.

राजधानी दिल्लीतील शाहीन बाग परिसरातही गेल्या पंधरा डिसेंबरपासून नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू होऊन जवळपास पंचेचाळीस दिवसाचा कालावधी झाला आहे. आगामी अजून किती दिवस हे आंदोलन सुरू राहणार यासंदर्भात अजूनही स्पष्टता नाही. जोपर्यंत नागरिकत्व सुधारणा कायदा परत घेतल्या जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा चंग शाहीन बाग आंदोलनकर्त्यांनी बांधला आहे. या आंदोलनामध्ये महिला बालक आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. महिला या समाजातील पहिल्या घटक आहे, हे समजुन या आंदोलनात जे धरणे प्रदर्शन सुरू आहे. त्या धरणे प्रदर्शनात सर्वात प्रथम महिला बसलेल्या आहेत. या महिलांमध्ये मुली तरुणी आणि वयोवृद्ध महिला सहभागी झालेल्या आहेत. यांच्यासाठी येथे हे मंडप टाकण्यात आलेला आहे. या मंडपाच्या आत थंडीची पर्वा न करता या महिला आंदोलन करत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!