Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

देश : आंदोलनात सहभागी होण्यासाठी परवानगी घेतली नाही , चंद्रशेखर आझाद यांना हैद्राबाद पोलिसांकडून अटक

Spread the love

हैदाबाद पोलिसांनी  भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना ताब्यात घेतले आहे. कोणतीही परवानगी न घेता सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलनात सहभागी होण्यासाठी चंद्रशेखर आझाद तेलंगणात पोहोचले होते. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात रविवारी आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी चंद्रशेखर आझाद यांनी पोलिसांची परवानगी घेतली नव्हती, म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली.

यासंबंधी अधिक माहिती देताना हैदराबाद पोलिसांनी सांगितले की, चंद्रशेखर आझाद यांना लंगरहाऊस पोलिस स्टेशन हद्दीत सीमेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्यांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी पोलिसांची कोणत्याही प्रकारे परवानगी घेतली नव्हती. चंद्रशेखर सध्या जामिनावर बाहेर आहेत. चंद्रशेखर आझाद यांनी याआधी दिल्लीतील शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आंदोलनकर्त्यांना संबोधित केले होते. तसेच जामिया मिल्लिया इस्लामिया या ठिकाणीही हजेरी लावली होती. चंद्रशेखर आझाद यांच्या विरुद्ध दिल्लीत २० डिसेंबर रोजी जामा मशीद जवळ सीएए विरोधात आंदोलन करून जमावाला भडकावले असा आरोप आहे. पोलिसांनी आझाद यांच्याविरोधात दंगल भडकावणे, सरकारी कामात अडथळा आणणे, लोकांना हिंसक आंदोलन करायला भाग पाडणे, असा आरोप आहे. त्यामुळे चंद्रशेखर यांना अटक करण्यात आली होती. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात उभे केल्यानंतर कोर्टाने त्यांना काही अटीवर जामीन दिला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!