प्रजासत्ताक दिन : शाहरुख खानच्या या वक्तव्याची सर्वत्र होतेय तारीफ…

Advertisements
Advertisements
Spread the love

सिने अभिनेता  शाहरुख खान याच्या वक्तव्याचे सध्या कौतुक होत आहे. शाहरुख खान नुकताच “डान्स प्लस” या रिअॅलिटी शोमध्ये गेला होता. यावेळी शाहरुखने अशी एक  गोष्ट सांगितली कि, हि गोष्ट व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शाहरुख यावेळी म्हणाला की, ‘आम्ही घरात कधीही हिंदू- मुस्लिम या विषयावर बोलत नाही. माझी बायको हिंदू आहे आणि मी मुस्लिम आणि माझी मुलं हिंदुस्तानी आहेत.’ शाहरुखच्या तोंडून हे वाक्य ऐकून सारेच भारावून गेले आणि त्याच्या या वाक्याला टाळ्यांनी दाद दिली.

Advertisements

शाहरुख पुढे म्हणाला की, ‘सुहाना जेव्हा लहान होती तेव्हा तिला शाळेचा एक फॉर्म भरायचा होता. त्यात धर्म लिहायचा होता. तिने मला आपला धर्म कोणता असा प्रश्न विचारला तेव्हा मी तिला आपण भारतीय आहोत असंच उत्तर दिलं. कोणताही धर्म नाही आणि असूनही नये असं मला वाटतं.’ शाहरुख खानचे हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार