Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : अवैध तिकीट विक्री रेल्वे पोलिसांकडून एक अटक, 30 सिमकार्ड जप्त

Spread the love

रेल्वेच्या अवैध तात्काळ तिकीट विक्री प्रकरणी आरपीएफच्या जवानांनी उत्तरप्रदेशातील सोहेल अहमद समीऊल्ला (२५, मुळ रा. गौंडा, उत्तरप्रदेश, ह. मु. बुढीलेन) याला अटक केली आहे. विशेष म्हणजे त्याच्या खोलीतून पोलिसांनी मोबाईलचे ३० सीमकार्ड जप्त केले आहेत. तर ७० युजर आयडी वापरत असल्याचे समोर आले आहे. दहशतवादी वित्तपुरवठ्यातील रॅकेटमध्ये सोहेलचा समावेश असल्याचे उघड झाले असून, पाकिस्तान, बांग्लादेश व दुबईशी हे रॅकेट जुळलेले आहे.
रेल्वेतील तात्काळ तिकीटांची वेबसाईट हॅक करुन रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना रॅकेटने आव्हान दिले होते. याप्रकरणी आसामच्या भुवनेश्वरमधून म्होरक्या गुलाम मुस्तफा (२८) याला अटक करण्यात आली आहे. त्याने बंगळुरुमध्ये काऊंटर तिकिटाची नोंद करुन कारकिर्दीला सुरूवात केली. त्यानतंर त्याने त्यानंतर ई-तिकिटे आणि अवैध सॉफ्टवेअरचे पदवी प्राप्त केली. गेल्या दहा दिवसांपासून आयबी, स्पेशल ब्युरो, ईडी, एनआयए, कर्नाटक पोलिसांनी मुस्तफाची चौकशी केली होती. मुस्तफाकडे यावेळी तीन हजार ५६३ वैयक्तिक आयआरसीटीसी यूझर आयडी असल्याचे उघड झाले. त्याचे विविध सरकारी बँकांमध्ये खाते असल्याचा संशय आहे. मुस्तफा हा डार्कनेटमध्ये प्रवेश करण्यासाठी सॉफ्टवेअर वापरत होता. लॅपटॉपवर आधारित हॅकिंग सिस्टम त्याच्या लॅपटॉपवर सापडले आहेत. या रॅकेटमुळे देश-विदेशातील शाखा असलेली भारतीय सॉफ्टवेअर कंपनी देखील अडचणीत आली आहे. मुस्तफाच्या मोबाईलमधून पाकिस्तानी, बांग्लादेशी, इंडोनेशियन, नेपाळमधील अनेकांचे क्रमांक आढले आहेत. त्याच्याकडे बनावट आधार कार्ड तयार करण्याचा अर्जही आढळला आहे.


सोहेलचा बॉम्बस्फोटाशी संबंध ?
उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातील एका शाळेत झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये शरीफ नावाचा तरुण हा सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून होता. तर अशरफ नावाचा तरुण आता दुबईत पळून गेल्याचा संशय आहे. या संघटित रॅकेटचे पहिले उद्दीष्ट रोख उत्पन्न करणे हा आहे. एकदा ते पैसे जमले की ते नंतर दहशतवादी वित्तपुरवठाकडे वळतात. त्यांच्याकडून जमा झालेल्या सर्व माहितीने दहशतवादी वित्तपुरवठा आणि मनी लाँडरिंगचा दुवा दर्शविला जात आहे. सोहेल अहेमद याचा बॉम्बस्फोटाशी संबंध आहे का ? याचा तपास केला जात असल्याची माहिती आरपीएफचे अधिकारी अरविंद शर्मा यांनी दिली.


सहा वर्षांपासून शहरात वास्तव्य…..
सोहेल अहेमद हा गेल्या सहा वर्षांपासून शहरातील बुढीलेन वास्तव्याला आहे. तो टेलरिंगचे काम करत मोबाईलवरुन रेल्वेच्या तात्काळ तिकीटांचा गोरखधंदा करत होता. गुवाहाटी पोलिसांनी रेल्वे तिकीटांची अवैध विक्री करणाºया म्होरक्याला तेथे पकडले होते. त्याच्या चौकशीतून अनेकांची नावे समोर आली आहे. त्यापैकी सोहेल अहेमद हा एक आहे. त्याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्याच्याकडून ३० सीमकार्ड जप्त करण्यात आल्याचेही अधिकारी म्हणत आहेत.


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!