सोशल मीडिया : आठ लाख फॉलोअर असलेला आणि ज्याच्या फोटोला साडेतीन लाखाहून अधिक लाईक्स मिळविणारा हा उद्योजक आहे तरी कोण ?

Advertisements
Advertisements
Spread the love

Advertisements

वर्तमानकाळात प्रत्येक व्यक्तीला सोशल मीडियाचा लळा लागला आहे मग ती व्यक्ती गरीब असो कि , श्रीमंत . उद्योगपती असो कि , बेरोजगार प्रत्येक व्यक्तीला सोशल मीडियाचे आकर्षण आहे.प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटासुद्धा त्याला अपवाद नाहीत. यांनी गुरुवारी आपलं तारुण्यातील एक छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर केलं. तरुण रतन टाटांच्या या छायाचित्राने लोकांची मने जिंकली आहेत. टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना इन्स्टाग्रामवर आठ लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. आणि हो, ही त्यांची १५ वी पोस्ट होती !

Advertisements
Advertisements

सध्या रतन टाटा ८२ वर्षांचे आहेत पण त्यांनी काल जे छायाचित्र आपल्या इंस्टाग्रामच्या अकाऊंटवरून पोस्ट केलं आहे, त्यात ते अवघे २५ वर्षांचे होते. त्यांचा हा सुंदर आणि आकर्षक फोटो पाहून अनेक लोकांना तर ते हॉलिवूडचे अभिनेते वाटले! हा फोटो लॉस एंजेलिस मधील आहे. रतन टाटा अमेरिकेत शिकत होते. शिक्षण आणि नंतर काही काळ काम केल्यानंतर ते १९६२ मध्ये भारतात परतले.

या पोस्टवर रतन टाटा यांनी लिहिले आहे कि ,  ‘हे छायाचित्र मला बुधवारीच शेअर रायचे होते. पण मला कुणीतरी ‘थ्रो बॅक थर्सडे’ बद्दल सांगितले. त्यामुळेच हा लॉस एंजेलिसचा फोटो शेअर करत आहे.’ टाटा यांच्या या फोटोला आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत! तीन हजारांहून अधिक लोकांनी टाटा यांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या पूर्वीही त्यांनी १७ नोव्हेंबर २०१९ रोजी आपला तारुण्यातील फोटो पोस्ट केला होता या फोटोला पावणेतीन लाखाहून अधिक लाईक्स मिळाले होते. तर त्यांनी पोस्ट केलेल्या त्यांच्या कुत्र्याच्या पोस्टला जवळपास चार लाख लोकांनी लाईक केले होते.

आपलं सरकार